जॉन्टी ऱ्होड्सच्या मते हा भारतीय खेळाडू आहे जगातील सर्वोत्तम फिल्डर  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

जॉन्टी ऱ्होड्स हे आयपीएल दरम्यान मुंबई इंडीयन संघाचे फिल्डींग कोच म्हणून काम केले आहे. यावर्षी ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे फिल्डींग कोच आहेत

जगाताल सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक असणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जाँन्टी ऱ्होड्स यांनी सध्या जगातील सर्वात चांगला फिल्डर कोण? असा प्रश्न सुरेश रैनाने इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला ऱ्होड्सने मजेदार उत्तर दिले आहे. त्यांना सांगीतले की सध्याच्या घडील रविंद्र जडेजा हा मॉडर्न क्रिकेट मधील सर्वोत्तम फिल्डर्स आहे असे सांगीतले आहे. जॉन्टी ऱ्होड्स हे आयपीएल दरम्यान मुंबई इंडीयन संघाचे फिल्डींग कोच म्हणून काम केले आहे. यावर्षी ते किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे फिल्डींग कोच आहेत, मात्र कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आले आहे. 

लाईव्ह संभाषनादरम्यान ऱ्होड्स यांनी जडेजा सोबत आणखी वेगवेगळ्या खेळाडूंची नावे उत्तरादरम्यान घेतली त्यांनी सांगातले की जडेजाच्या फिल्डींगमागे त्याचे सपर्पन असल्याचे सांगीतले त्यासोबतच एबी डीव्हिलियर्सला, मार्टिन गप्टील, रवींद्र जाडेजा हे उत्तम फिल्डर आहेत. मायकल बेवन हा देखील चांगला फिल्डर होता. जाडेजा मैदानावर खूपच चपळ आहे. असे जॉन्टी ऱ्होड्स यांनी सांगीतले. सुरेश रैना बद्दल बोलताना तो म्हणाला की, “तुला फिल्डींग करताना पाहताना मला माझी आठवण होते. मला महिती आहे की भारतीय मैदानांवर फिल्डींग करणे खूप कठीण असते, मी तुझा पहिल्यापासून चाहता आहे ” 

"भारतीय प्रेक्षकांच्या भीतीने ग्वाल्हेरमध्ये पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!"

1992 साली क्रिकेट पदार्पण करणाऱ्या ऱ्होड्स यांना रैनाने त्या काळातील तसेच आताच्या मॉडर्न क्रिकेट मधील फिल्डींग यात फरक विचारल्यानंतर तो म्हणाला की, तेव्हा फिल्डींग हा तेव्हा तेवढी महत्वाची गोष्ट नव्हॉती, तेव्हा संघात दोन-तीनच चांगले फिल्डर असायचे आणि आता फिटनेसचा स्तर देखील खूप वाढला आहे. फक्त टी20 नाही तुम्ही कसोटी सामन्यात देखील विराटसारख्या खेळाडूला दुसऱ्यांदा संधी देऊ शकत नाहीत.नाहीतर तो कधीच बाद होणार नाही असे मत मांडले


​ ​

संबंधित बातम्या