प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतानाही 'मॅन ऑफ द मॅच' ठरलेला महारथी

सुशांत जाधव
Monday, 27 July 2020

जोनाथन नील ऱ्होड्स असं त्याचं खर नाव. पण क्रिकेटच्या मैदानात त्याला जॉन्टी याच नावान ओळखल जात.  

पुणे: क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम फिल्डर कोण? असा प्रश्न विचारला तर आपसूक नाव येतं ते दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्सचे. आपल्या क्षेत्ररक्षणाने त्याने क्रिकेटच्या मैदानात एक क्षेत्ररक्षणाचा एक मापदंड सेट केला. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामन्याला कलाटणी मिळू शकते हे जॉन्टीने दाखवून दिले. बऱ्याच लोकांना त्याचे संपूर्ण नाव ही माहित नसेल. जोनाथन नील ऱ्होड्स असंत त्याचं खर नाव. पण क्रिकेटच्या मैदानात त्याला जॉन्टी याच नावान ओळखल जात.

1992 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने जॉन्टीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. मैदानात उडी मारुन चेंडूवर सुपर मॅनसारखे झेप घेण्याच्या त्याची कृती क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का देणारी होती. यापूर्वीही क्षेत्ररक्षणाचा दर्जा खालच्या दर्जाचा होता असे नाही पण त्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण काय असते याची नवी अनुभूती दाखवून दिली. भारताविरुद्ध 1992 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जॉन्टीने आयपीएमध्ये मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी ही सांभाळली आहे. 

श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूकडून सौरव गांगुलीचे तोंडभर कौतूक

प्लेइंग इलेव्हनमध्ये नसून देखील सामनावीराचा पुरस्कार मिळवण्याचा अनोखा विक्रम जॉन्टीच्या नावे आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. केवळ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या जॉन्टीने त्या सामन्यात सात झेल टिपले होते.  

बेस्ट रन आउट ऑफ ऑल टाइम

पाकिस्तान विरुद्ध 1992 च्या विश्वचषकात  इंझमाम-उल-हकला त्याने अप्रतिमरित्या धावबाद केले होते. आतापर्यंतचा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम धावबाद पैकी तो एक क्षण होता. क्रिकेट प्रेमी ती विकेट अजूनही विसरला नसेल.  

मुंबईच्या मैदानात विश्वविक्रमाला गवसणी

जॉन्टी ऱ्होडसने 1993 मध्ये विंडीज विरुद्धच्या सामन्यात अफलातून क्षेत्ररक्षणाचा सर्वोच्च नमुना दाखवून दिला होता. या सामन्यात त्याने पाच झेल पकडले होते. यष्टीरक्षकाशिवाय अन्य क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या मैदानातील एका सामन्यात सर्वाधिक झेल पकड्याचा हा विश्वविक्रम आहे.    

हॉकी संघातही झाली होती निवड 

रोड्सने दक्षिण आफ्रिकेच्या हॉकी संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे.  1992 मध्ये त्याला ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. दुखापतीमुळे त्याने ट्रायलमध्ये सहभाग घेतला नव्हता.  
 


​ ​

संबंधित बातम्या