जाँटीने केलेले ते धावचीत, सदैव करीत राहील चकित

मुकुंद पोतदार
Saturday, 27 July 2019

फक्त एका बाबतीत "क्रिकेट पंडित' एकमत दर्शवितात आणि ते म्हणजे फिल्डिंग! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम "फिल्डर' म्हणून जॉंटी ऱ्होड्‌सचे नाव एकमुखी घेतले जाते. याचे कारण त्याने सतत ISO STANDARD मेंटेन केले. अशा जाँटीचा आज हॅपी बर्थडे आहे. केवळ एका रन-आऊटच्या जोरावर क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या जाँटीच्या या पराक्रमाची आठवण जागवूयात आणि त्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात.

एका शतकाहून जास्त इतिहास असलेल्या क्रिकेटमध्ये दोन वेगळ्या कालखंडामधील खेळाडूंची तुलना करू नये, असे नेहमीच म्हटले जाते. प्रत्यक्षात फलंदाजीत डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विराट कोहली यांच्यापैकी श्रेष्ठ कोण? वेगवान गोलंदाजीतही अशी तुलना सुरू असते. जोएल गार्नर, अँडी रॉबर्टस, माल्कल मार्शल, मायकेल होल्डींग, डेनिस लिली, रिचर्ड हॅडली, कपिल देव, कोर्टनी वॉल्श, इयन बोथम, डेल स्टेन यांची नावे चर्चेत असतात. अष्टपैलूंचे मूल्यमापन करताना सुद्धा गॅरी सोबर्स यांच्या कामगिरीचा निकष लावला जातो. कर्णधारांमध्ये माईक ब्रिअर्ली, इम्रान खान, क्‍लाईव्ह लॉईड, अॅलन बोर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ यांची तुलना केली जाते. फिरकी गोलंदाजीत जिम लेकर, लान्स गिब्ज, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन यांच्यात स्पर्धा असते.

इतकेच काय अलिकडे "स्ट्रोकप्लेयर' म्हटल्यावर व्हिव रिचर्डस यांच्यापासून सुरवात होते. फक्त एका बाबतीत "क्रिकेट पंडित' एकमत दर्शवितात आणि ते म्हणजे फिल्डिंग! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम "फिल्डर' म्हणून जॉंटी ऱ्होड्‌सचे नाव एकमुखी घेतले जाते. याचे कारण त्याने सतत ISO STANDARD मेंटेन केले. अशा जाँटीचा आज हॅपी बर्थडे आहे. केवळ एका रन-आऊटच्या जोरावर क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या जाँटीच्या या पराक्रमाची आठवण जागवूयात आणि त्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात.

1992च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या इंझमाम उल हक याला त्याने "रन-आउट' करून इतिहास घडविला. त्यामुळे जाँटीचे नाव घरोघरी पोचले. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला हरवून सनसनाटी सुरवात केली होती. पण नंतर त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले. पुढील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्यांना 211 धावांचेच आव्हान उभे करता आले.

पावसाच्या व्यत्ययामुळे पाकला 194 धावांचे आव्हान देण्यात आले. त्यांनी 2 बाद 135 धावा केल्या होत्या. इंझमाम उल हक आणि इम्रान खान यांची जोडी जमली होती. इंझमामने 48 धावा केल्या होत्या. त्याची नजर चेंडूवर बसली होती. त्याने चेंडू "पॉइंट'च्या दिशेने "पुश' करीत "सिंगल' घेण्यासाठी धावण्यास सुरवात केली. इम्रानने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे इंझमाम "क्रीझ'मध्ये परत जाण्याच्या प्रयत्नात होता, तोपर्यंत जाँटीने "बॅकवर्ड पॉइंट'पासून धावत येत चेंडू अडविला होता. इंझमाम "क्रीझ'च्या जवळ पोचत होता, तर जाँटीसुद्धा "स्टंप'पासून दीड-दोन मीटर लांब होता. आता तो "थ्रो' केव्हा करणार, याकडे लक्ष लागले असतानाच जॉंटीने "टेकऑफ' केले.

"डायरेक्‍ट' "स्टंप'च्याच दिशेने त्याने "विलक्षण झेल घेतली. चेंडू हातात असल्यामुळे त्याने यष्ट्यांचा वेध घेतला. इंझमाम "रन-आउट' झाल्यानंतर मग पाकचा डाव मग घसरला आणि त्यांचा पराभव झाला. 

ब्रिस्बेनच्या मैदानावरील ते दृश्‍य पाहून क्रिकेटजगत स्तिमित झाले. त्या एका "रन-आउट'मुळे जॉंटी म्हणजेच "फिल्डिंग'चे "स्टॅंडर्ड' हे परिमाणच ठरले! मूळचा हॉकीपटू असलेला जॉंटी जात्याच "शार्प फिल्डर' होता असे मात्र नाही. त्याने हॉकीतील "रिफ्लेक्‍सेस'चा क्रिकेटमध्ये खुबीने वापर केला. त्याने "कॅचिंग'वर कमालीची मेहनत घेतली. "नेट प्रॅक्‍टिस'ची ठरलेली वेळ उलटल्यानंतरही त्याचा सराव थांबलेला नसायचा. त्यामुळे "टीम बस' निघायला अनेक वेळा उशीर व्हायचा, कारण जॉंटीची "फिल्डिंग प्रॅक्‍टिस' सुरूच असायची! 

जाँटी दहा मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरून "शार्प कॅच' झेलायची "प्रॅक्‍टिस' करायचा. क्रिकेटच्या इतिहासातील "आद्य स्पेशालिस्ट फिल्डर' म्हणून त्याचे नाव घेतले जाते. "फिल्डिंग'कडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात जाँटीमुळे आमूलाग्र बदल झाला. त्याने दिलेले हे योगदान लक्षणीय ठरले.


​ ​

संबंधित बातम्या