ENGVsWI : तिसऱ्या व निर्णायक कसोटीत जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन  

ऋतुराज मोगली
Thursday, 23 July 2020

कोरोनाच्या काळानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर, या दोन्हीही संघात उद्या शुक्रवार 24 जुलै पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होणार आहे.

कोरोनाच्या काळानंतर इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर, या दोन्हीही संघात उद्या शुक्रवार 24 जुलै पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना होणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या संघाची घोषणा केली असून, वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर या खेळाडूंचा समावेश केला आहे. 

सेरेनाची 2 वर्षाची मुलगी संघाची मालक

मँचेस्टर येथील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. तर साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जैव-सुरक्षित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल मागील दुसऱ्या कसोटीकरिता जोफ्रा आर्चरवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर जोफ्रा आर्चरने आपल्या कृतीवर माफी मागितली होती. तर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) जोफ्रा आर्चरवर कारवाई करत, दंडही ठोठावला होता. इंग्लंड - वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका जैवसुरक्षित वातावरणात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचा संघ एकत्रितपणे एजेस बाऊलहून ओल्ड ट्रॅफर्डला येणे अपेक्षित होते. मात्र या प्रवासादरम्यान आर्चर होव येथील आपल्या घरी गेला असल्याचे समजले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेल्या संघात आर्चरचा समावेश असल्याचे जाहीर झाल्यावरच हे इंग्लंड संघ व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर जोफ्रा आर्चरवर कारवाई करण्यात आली होती.    

जागतिक विजेत्या सिंधूचा घरातच 'सराव' 

याअगोदर, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 8 जुलै रोजी पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1 - 0 ने आघाडी मिळवली होती. मात्र मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने जोरदार पुनरागमन करत, वेस्ट इंडिज संघाचा पराभव केला होता. या विजयसोबतच तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज संघाशी 1 - 1 ने बरोबरी साधली. त्यामुळे उद्या पासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यात तिसरा व शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून, दोन्हीही संघ मालिका काबीज करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.    

 


​ ​

संबंधित बातम्या