हो! आमचा खेळ खराब झाला : जर्मनीचे प्रशिक्षक

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

मॉस्को : मेक्‍सिकोविरुद्धच्या सामन्यातील पूर्वार्धात आमचा खेळ खूपच खराब झाला', अशी कबुली गतविजेत्या जर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिम लोव यांनी दिली. काल (रविवार) झालेल्या सामन्यात जर्मनीला मेक्‍सिकोकडून 0-1 असा पराभव स्वीकारावा लागला. 

फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेत सलामीचा सामना गमाविण्याची गेल्या 36 वर्षांमधील ही जर्मनीची पहिलीच वेळ आहे. 'पूर्वार्धात आम्ही खराब खेळलो. आमच्या नेहमीच्या शैलीत खेळ होऊ शकला नाही. आमच्या खेळाडूंचे पास चुकत होते आणि आक्रमणातही समन्वय नव्हता. उत्तरार्धात जर्मनीचा समन्वय सुधारला; पण मेक्‍सिकोने बचाव चांगला केला', असे लोव म्हणाले. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत जर्मनीने कायमच बाद फेरीत प्रवेश केला आहे. त्यांची पुढील लढत 23 जून रोजी स्वीडनशी होणार आहे. त्यापूर्वी जर्मनीला मागील सामन्यातील कच्च्या दुव्यांवर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही प्रशिक्षकांनी स्पष्ट केले. 

पराभवातून पुन्हा विजयाच्या मार्गावर जाण्याची सवय जर्मनीला आहे. एका पराभवामुळे आम्ही आमच्या योजना बदलणार नाही. आमच्या योजनांची प्रत्यक्ष मैदानावर अंमलबजावणी करू शकणारे खेळाडू संघात आहेत. 
- ज्योकिम लोव, जर्मनीचे प्रशिक्षक

​ ​

संबंधित बातम्या