जकार्तातील भरपाई दोहात करण्यास जिन्सॉन उत्सुक 

नरेश शेळके
Monday, 8 April 2019

नागपूर, ता. 8 : गेल्यावर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी मंजीत सिंगचे नाव फारसे कुणी ऐकले नव्हते. मात्र, सुवर्णपदकाचा प्रवळ दावेदार जिन्सॉन जॉन्सनवर मात करून मंजीतने सुवर्णपदक जिंकल्याने तो प्रकाशझोतात आला होता. देशवासी मंजीत जिंकल्याचा आनंद जिन्सॉन असला तरी सुवर्णपदक हुकल्याची खंत अजूनही त्याला आहे. ही भरपाई या महिन्यात दोहा येथे होणाऱ्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भरून काढण्यासाठी तो उत्सुक आहे. 

नागपूर, ता. 8 : गेल्यावर्षी जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी मंजीत सिंगचे नाव फारसे कुणी ऐकले नव्हते. मात्र, सुवर्णपदकाचा प्रवळ दावेदार जिन्सॉन जॉन्सनवर मात करून मंजीतने सुवर्णपदक जिंकल्याने तो प्रकाशझोतात आला होता. देशवासी मंजीत जिंकल्याचा आनंद जिन्सॉन असला तरी सुवर्णपदक हुकल्याची खंत अजूनही त्याला आहे. ही भरपाई या महिन्यात दोहा येथे होणाऱ्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत भरून काढण्यासाठी तो उत्सुक आहे. 

केरळचा असलेला जिन्सॉन हा 800 व 1500 मीटर या दोन्ही शर्यतीत भाग घेत असला तरी त्याची सुरुवातीची ओळख आठशे मीटरचा धावपटू अशीच आहे. त्यामुळे त्याच्याकडून आशियाई पातळीवर नेहमीच आठशे मीटरमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा केली जाते. अजूनही तरी 28 वर्षीय जिन्सॉनला सुवर्णपदकाला स्पर्श करता आलेला नाही. सध्या उटी येथे जे.एस. भाटीया यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत असून दोहा येथे 21 एप्रिलपासून होणाऱ्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 800 व 1500 मीटर अशा दोन्ही इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. तो म्हणाला, आतापर्यंत दोन आशियाई ऍथलेटिक्‍स आणि एका आशियाई क्रीडा स्पर्धेत आठशे मीटरमध्ये मला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे, हे खरे असले तरी ते जिंकणे माझ्ये ध्येयही आहे. त्यासाठी जोमात तयारीही करीत आहे. 

जागतिक ऍथलेटिक्‍स महासंघाने नवीन रॅंकींग पद्धत सुरु केले असून आशियात जिन्सॉन रॅंकींगमध्ये दोन्ही इव्हेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर असला तरी वेळेच्या बाबतीत आठशे मीटरमध्ये बाराव्या तर पंधराशे मीटरमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे आठशे मीटरमध्ये सर्वोत्तम वेळेसह तु सुवर्णपदक जिंकशील का? असे विचारल्यावर जिन्सॉन म्हणाला, मी फक्त सुवर्णपदकाचा विचार करीत आहे. कारण या दोन्ही शर्यतीत अतिशय डावपेचपूर्ण पद्धतीने धावल्या जातात. त्यामुळे अनेकदा वेगवान शर्यत होऊनही सुवर्णपदक हातून निसटते तर कधी संथ वेळ देऊनही कुणी सुवर्णपदकाचा मानकरी ठरतो. आशियाई पातळीवर दोन्ही इव्हेंटमध्ये सहभागी होत असलो तरी जागतिक पातळीवर फक्त पंधराशे मीटरवर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. 

तो म्हणाला, आशियात सध्या मी नंबर एक वर असलो तरी जागतिक पातळीवरील रॅंकींगमध्ये सुधारणा करण्यासाठी मला डायमंड लीगसह विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. माझी इच्छा असली तरी याविषयीचा निर्णय भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाची योजना (प्लॅनिंग) समिती घेत असते. कारण टोकीयो ऑलिंपीकमध्ये वेळेच्या आधारावर दुर्दैवाने पात्र ठरलो नाही तर रॅंकीकद्वारेही पात्र ठरण्याची संधी आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतल्याने दर्जेदार, आपल्यापेक्षा काकणभर वरचढ असलेल्या आणि विविध देशाच्या धावपटूंसोबत धावण्याचा सराव होतो. त्यामुळे साहजीकच आपल्याला सुधारणा करण्याची संधी मिळते. भारतात सध्या दोन्ही इव्हेंटमध्ये असलेले इतर स्पर्धक वाईट किंवा सुमार आहे, असे नाही. परंतु अधिक चांगले प्रतिस्पर्धी मिळाले तर त्याचा नक्की फायदा होतो. 

सेनादलात नायब सुभेदार पदावर कार्यरत असलेल्या जिन्सॉनने गेल्यावर्षी गोल्डकोस्ट येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पंधराशे मीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळविताना बहादूर प्रसादचा 23 वर्ष तर जुन महिन्यात गुवाहाटी येथे सिनिअर आंतर राज्य स्पर्धेत श्रीराम सिंग यांचा आठेशे मीटरमधील 42 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडित काढला होता. दोहातील आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दोहा येथेच सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्‍व स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. 

जिन्सॉनचे राष्ट्रीय विक्रम 
800 मीटर : गुवाहाटी (2018) : 14 मि.45.65 सें 
1500 मीटर : गोल्डकोस्ट (2018) : 3मि.37.86 सें 
जिन्सॉनची आशियाई पातळीवरील कामगिरी 
आशियाई ऍथलेटिक्‍स (800 मीटर ) 
2015 (वुहान) रौप्य 
2017 (भुवनेश्‍वर) ब्रॉंझ 
आशियाई क्रीडा स्पर्धा (जकार्ता) 
1500 मीटर - सुवर्ण 
800 मीटर - रौप्य 


​ ​

संबंधित बातम्या