त्याने बऱ्याचदा विराटला तंबूचा रस्ता दाखवला, पण...

सुशांत जाधव
Wednesday, 22 July 2020

विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे यात कोणतीही शंका नाही. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा त्याच्यात कमालीचा उत्साह असतो.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज आहे, असे ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज झाय रिचर्डसनने म्हटले आहे. रिचर्डसनने आपल्या कारकिर्दीत अनेकदा विराटला बाद करण्याचा पराक्रम केलाय. पोडकास्टच्या माध्यमातून झालेल्या एका मुलाखतीमध्ये रिचर्डसनला आतापर्यंत ज्या फलंदाजांना गोलंदाजी केली त्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता.  विराट आणि रोहित यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या प्रश्नावर  उत्तर देताना त्याने विराट कोहलीचे नाव घेतले.

एक सामना, दोन डाव अन् खंडीभर रेकॉर्ड; स्टोक्स जोमात प्रतिस्पर्धी कोमात 

तो म्हणाला की, विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे यात कोणतीही शंका नाही. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा त्याच्यात कमालीचा उत्साह असतो. भारतीय संघात रोहित शर्मासारखा दिग्गज फलंदाजही आहे. पण विराट कोहलीला तोड नाही, अशा शब्दांत त्याने विराट हा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले. विराट कोहली कोणत्या दिशेला चेंडू खेळणार याचा अंदाज बांधणं खूप कठिण असतं. तो आपल्या खेळीतून संघातील सहकाऱ्यांनाही खेळाडूंनाही प्रोत्साहन देतो, असेही रिचर्डसनने सांगितले. 

भारतास खूष करण्यासाठी वर्ल्डकपबाबत कांगारुंचे नमते? 

झाय रिचर्जसन खांद्याच्या दुखापतीमुळे अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. दुखापतीमुळे त्याला इंग्लंडमध्ये 2019 मध्ये झालेल्या विश्वचषकासह अ‍ॅशेस मालिकेला मुकावे लागले होते. मागील वर्षी त्याने दुखापतीतून सावरत कमबॅकही केल. काही एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या संधीवेळी तो पूर्णत: फिट असल्याचे दिसले नव्हते.  झाय रिचर्डसनने वनडे सामन्यात अनेकवेळा विराट कोहलीला बाद केले आहे. यावर तो म्हणाला की, मी अधिकवेळा विराटला भारतीय मैदानावर गोलंदाजी केली आहे. तो सुरुवातीपासून माझ्या विरोधात आक्रमक खेळताना दिसते. पहिल्या चेंडूपासून धावा करण्याचा तो प्रयत्न करताना दिसले. रिचर्डसनने ऑस्ट्रेलियाकडून 13 वनडे सामन्यात त्याने 24 बळी टिपले असून यात विराटला त्याने चारवेळा बाद केले आहे. विराटला बाद करुन तो चांगलाच चर्चेतही आला होता. 


​ ​

संबंधित बातम्या