'मलिंगाने मला यॉर्कर शिकविला नाही, पण...'; बुमराच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ!

वृत्तसंस्था
Friday, 3 January 2020

घट्ट शिवण असलेले रबराचे चेंडू आम्ही खेळताना वापरायचो. आम्ही जिथे खेळायचो तिथे व्यवस्थित खेळपट्टी नव्हती, ना विकेटकीपर.

मुंबई : आयपीएल 2020 स्पर्धेचा पहिला लिलाव नुकताच पार पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना आपापले संघ बदलावे लागले, तर काही खेळाडू आहे त्याच संघात कायम राहिले आहेत. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सर्व सीझनमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. कारण मुंबई संघाने आतापर्यंत सर्वात जास्त 4 वेळा या स्पर्धेचा करंडक उंचावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात भारतीय खेळाडू जसप्रित बुमराह आणि श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगा यांचाही समावेश आहे. गेल्या वर्षीचा अंतिम सामना गाजवणाऱ्या मलिंगामुळे मुंबईला विजेतेपदाची चव चाखता आली. मात्र, मलिंगाविषयी बुमराने केलेल्या एका विधानामुळे क्रिकेट विश्वात खळबळ निर्माण झाली आहे.  

- Video : क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द बघून सचिन झाला भावूक!

''यॉर्कर मास्टर असलेल्या लसिथ मलिंगाने मला यॉर्कर शिकवला, असे लोक म्हणतात. मात्र, असं काही नाही. मलिंगाबरोबर असताना त्याने  मला मानसिक खंबीरपणा शिकवला होता, परंतु त्याने यॉर्कर्सबद्दल मला कधीही काहीही सांगितले नाही,'' असे बुमराने म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी बुमराहने याबाबतचा खुलासा केला आहे. 

- पंतने शेअर केले गर्लफ्रेंडसोबतचे बर्फातले फोटो, एकदा बघाच 

''अनपेक्षित परिस्थितीमध्ये गोलंदाजाने कशाप्रकारे विचार करावा, तसेच मनासारख्या गोष्टी होत नसतील तर गोलंदाजाने काय करावे, तसेच स्वत:ची रणनीती कशी आखावी, या गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो. मात्र, यॉर्करबद्दल त्यानं मला काही शिकवलं नाही,'' असे बुमराने म्हटले आहे. 

बुमरा पुढे म्हणाला, ''लहानपणी घट्ट शिवण असलेले रबराचे चेंडू आम्ही खेळताना वापरायचो. आम्ही जिथे खेळायचो तिथे व्यवस्थित खेळपट्टी नव्हती, ना विकेटकीपर. त्यामुळे जर विकेट घ्यायची असेल, तर यॉर्कर्स टाकावे लागतील, हे मला समजून आले. तेव्हापासून फलंदाजाच्या अंगावर बॉल टाकणे किंवा यॉर्कर टाकून त्याला बाद करणे हाच ऑप्शन आमच्याकडे असायचा. आजही हाच फॉर्म्युला एक यशस्वी गोलंदाज म्हणून माझ्यासाठी उपयोगी ठरत आहे.''

- हार्दिक पंड्याने काल दिली प्रेमाची कबुली; आज केलं तिला प्रपोज!

2013 मध्ये मी बडोद्याकडून खेळत होतो. त्यानंतर मी मुंबई इंडियन्समध्ये सामील झालो. 2016 च्या आयपीएलच्या मोसमात मला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली. मात्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारमध्ये मी उत्तम कामगिरी करत आहे, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.


​ ​

संबंधित बातम्या