'त्या' आजींची बुमरा स्टाईल बॉलिंग बघाच (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

बुमराहच्या अनोख्या शैलीची आजींनी केलेली नक्कल सगळ्यांचे मन जिंकत आहे. शांता सखूबाई असे या आजींचे नाव असून, त्यांनी मी बुमराच्या गोलंदाजीची नकल करत असल्याचे ट्विटर केले होते. या आजींच्या व्हिडिओवर बुमराहनं, 'या आजींनी माझा दिवस बनवला', असे ट्विट करत व्हिडिओ टाकला होता. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ विश्वकरंडकातून बाहेर पडला असला तरी भारतीय खेळाडूंची क्रेझ प्रेक्षकांमधून कमी झालेली नाही. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराच्या स्टाईलमध्ये एका आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विश्वकरंडकात आपण चारुलता पटेल या आजींनी पिपाण्या वाजवून भारतीय संघाला पाठिंबा दिला होता. आता चारूलता आजीनंतर आणखी एका आजींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांनी चक्क भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नक्कल केली आहे. त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीनं सर्वांनाच भुरळ पाडली आहे. अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. 

बुमराहच्या अनोख्या शैलीची आजींनी केलेली नक्कल सगळ्यांचे मन जिंकत आहे. शांता सखूबाई असे या आजींचे नाव असून, त्यांनी मी बुमराच्या गोलंदाजीची नकल करत असल्याचे ट्विटर केले होते. या आजींच्या व्हिडिओवर बुमराहनं, 'या आजींनी माझा दिवस बनवला', असे ट्विट करत व्हिडिओ टाकला होता. 

​ ​

संबंधित बातम्या