जेसन होल्डर अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अंडररेटेड खेळाडू - सचिन तेंडुलकर

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

जागतिक क्रिकेट मध्ये मोलाचे योगदान दिलेल्या वेस्ट इंडिज संघाचा माजी फलंदाज ब्रायन लारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत या मालिकेचे पूर्वावलोकन केले. 

कोरोनाच्या काळानंतर आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरवात होणार आहे. यजमान इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघात साऊथॅम्प्टन येथील एजेस बाऊल येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे आहे. कोरोनामुळे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर  इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाचे क्रिकेटपटू मैदानावर उतरणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात प्रत्येकी तीन कसोटी आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी जागतिक क्रिकेट मध्ये मोलाचे योगदान दिलेल्या वेस्ट इंडिज संघाचा माजी फलंदाज ब्रायन लारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत या मालिकेचे पूर्वावलोकन केले. 

 

कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्याच्या अगोदर दोन्ही संघाचा आढावा घेताना भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिज संघाचा माजी फलंदाज ब्रायन लाराची व्हर्च्युअल मुलाखत घेतली आहे. सचिन आणि ब्रायन लाराने सोशल मीडियावर एकत्र येत संवाद साधला. या संवादात ब्रायन लाराने वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर आणि वेगवान गोलंदाज केमर रोच हे दोन खेळाडू कॅरेबियन संघासाठी महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच ब्रायन लाराने वेस्ट इंडीजच्या 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरची जोरदार प्रशंसा करत, जेसन होल्डर हा वेस्ट इंडिज संघासाठी ग्रॅमी स्मिथ ठरणार असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त जेसन होल्डरवर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने विश्वास ठेवून, त्याच्या नेतृत्व कौशल्याचे समर्थन करणे गरजेचे असल्याचे मत ब्रायन लाराने यावेळेस व्यक्त केले.  

BlOG : गोऱ्यांच्या देशात क्रिकेट मैदानावर उठणार अन्यायाविरोधात आवाज

यानंतर सचिनने देखील ब्रायन लाराच्या मताशी सहमती दर्शवत, वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर अजूनही जागतिक क्रिकेटमधील सर्वात अंडररेटेड खेळाडूंपैकी एक असल्याचे म्हटले. व पुढे सचिनने कसोटी मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या जेसन होल्डरची प्रशंसा करताना, होल्डर फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये सर्वोत्कृष्ट योगदान देत असल्याचे सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर असताना केमर रोचने प्रभावी कामगिरी करत सगळ्यात अधिक विकेट्स घेतल्याचे ब्रायन लाराने नमूद करत, या मालिकेत देखील केमर रोच त्याची पुनरावृत्ती करण्याची आशा व्यक्त केली. आणि शाई होप त्याच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी धडपडत असल्याचे लाराने म्हणत, तो नक्कीच यावेळेस कामगिरी उंचावेल असे म्हटले आहे. तर  32 वर्षीय केमर रोच हा इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेदरम्यान विकेट्स घेण्याची क्षमता आणि त्याच्या अनुभवाच्या बरोबरीने महत्त्वपूर्ण खेळाडू ठरणार असल्याचे म्हटले आहे.                   

 


​ ​

संबंधित बातम्या