जपान बॅडमिंटन : श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक  

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

महिला एकेरीत सिंधूला चीनच्या गाओ फेंगजीए हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एक वर्षानी सिंधूचे आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आले. सिंधूने दिलेली झुंज कमीच पडली. गाओ हिने लढत 21-18, 21-19 अशी जिंकली. सिंधू गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये डेन्मार्क ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत हरली होती. 

टोकियो : भारताच्या किदांबी श्रीकांत याने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय या प्रमुख खेळाडूंना दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. 

महिला एकेरीत सिंधूला चीनच्या गाओ फेंगजीए हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एक वर्षानी सिंधूचे आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आले. सिंधूने दिलेली झुंज कमीच पडली. गाओ हिने लढत 21-18, 21-19 अशी जिंकली. सिंधू गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये डेन्मार्क ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत हरली होती. 

श्रीकांतने आपले सातत्य कायम राखताना हॉंग कॉंगच्या वोंग की व्हिन्सेंट याचा 21-15, 21-14 असा पराभव केला. आशियाई स्पर्धेत श्रीकांतला वोंगकडूनच पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीकांतची गाठ आता कोरियाच्या ली डोंग केऊनशी पडणार आहे. 

पुरुष एकेरीत दुसऱ्याच फेरीत एच. एस. प्रणॉयलाही पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या ऍन्थोनी सिनीसुका गिंटिंग याने त्याचा 21-14, 21-17 असा पराभव केला. ऍन्थोनीने आशियाई स्पर्धेत जपानच्या तुल्यबळ केंटो मोमोटा आणि ऑलिंपिक विजेत्या चेन लॉंग यांच्यावर विजय मिळविला होता. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताचे आव्हान संपुष्टात आले. 

पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी सुमीथ रेड्डीला चीनच्या हे जिटिंग-टॅन क्विआंग जोडीकडून 18-21, 21-16, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांना मलेशियाच्या चॅन पेंग सून-गोह लियु यिंग जोडीने 16-21, 16-21 असे पराभूत केले. 

पुरुष एकेरीच्या लढतीत श्रीकांत सुरवातीला विंगविरुद्ध 5-3 असा पिछाडीवर पडला होता. त्या वेळी श्रीकांतने सलग सात गुण घेत 10-5 अशी आघाडी मिळविली आणि त्यानंतर त्याने विंगला संधीच दिली नाही. दुसऱ्या गेमला तर विंग श्रीकांतचा सामनाच करू शकला नाही. पहिल्या गुणापासून श्रीकांतने वर्चस्व राखत 19-9 अशी आघाडी भक्कम केली. मात्र, विंगने प्रतिकार करीत श्रीकांतची आघाडी 19-14 अशी कमी केली. लढतीमधील चुरस वाढण्यापूर्वीच श्रीकांतने वेळीच खेळावर नियंत्रण राखून सलग दोन गुण जिंकत गेमसह विजय मिळविला. 

महिला एकेरीत सिंधूने सुरवातीला एक वेळ 8-4 अशा आघाडीवर असणाऱ्या गाओला गाठून तिच्यावर 17-14 अशी आघाडी मिळविली. गाओच्या दिशाहीन फटक्‍यांचा सिंधूने अचूक फायदा उठवला. मात्र, तिला आघाडी टिकविण्यात अपयश आले. गाओने त्यानंतर आपल्या फटक्‍यांवर नियंत्रण मिळवत सिंधूला केवळ एकच गुण मिळू दिला. दुसऱ्या गेममध्येदेखील सिंधूला सुरवातीच्या 4-0, 7-3 अशा आघाडीचा फायदा उठवता आला नाही. सिंधूने नंतर गाओला झुंजवले, पण तिला विजयापासून रोखण्यात सिंधूला अपयश आले. 

संबंधित बातम्या