Schoolympics 2019 : पहिल्याच दिवशी जान्हवीचे दुहेरी यश 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

'स्कूलिंपिक्‍स' आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या मोसमात पहिल्याच दिवशी सिंबायोसिस प्रशालेच्या जान्हवी फणसे हिने दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 ते 12 वर्षे वयोगटातील टेबल टेनिस क्रीडाप्रकारातील एकेरी आणि दुहेरीच्या सुवर्णपदकाचा निर्णय लागला.

पुणे : 'स्कूलिंपिक्‍स' आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या मोसमात पहिल्याच दिवशी सिंबायोसिस प्रशालेच्या जान्हवी फणसे हिने दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 ते 12 वर्षे वयोगटातील टेबल टेनिस क्रीडाप्रकारातील एकेरी आणि दुहेरीच्या सुवर्णपदकाचा निर्णय लागला. यामध्ये दोन्ही सुवर्णपदके जान्हवी फणसे हिने मिळविली. 

Schoolympics 2019 : ब्लॉसम, गुरुकुल प्रशाला संघांची विजयी सलामी 

डेक्कन जिमखान्याच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धेत जान्हवीने एकेरीच्या अंतिम लढतीत आपली शालेय सहकारी श्रीया शेलार हिचा पहिली गेम गमावल्यानंतर 7-11, 11-5, 11-9, 11-9 असा पराभव केला. जान्हवीने त्यानंतर दुहेरीच्या अंतिम लढतीत श्रीयाच्या साथीत अभिनव इंग्रजी माध्यम प्रशाला संघाच्या निधी भांडारकर-सोहा कोठावळे जोडीचा सरळ तीन गेममध्ये 11-9, 11-4, 11-4 असा पराभव केला. 

एकेरीत सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या नभा किरकोळे हिने सिंबायोसिसच्या रेवा चव्हाण हिचा पराभव करून ब्रॉंझपदक मिळविले. दुहेरीत मिलेनियम स्कूलची सारा सोनये-आकांक्षा मार्कंडे ही जोडी ब्रॉंझ पदकाची मानकरी ठरली. 

Schoolympics 2019 : सकाळ 'स्कूलिंपिक्‍स' स्पर्धेला उत्साहात सुरवात 

निकाल : 10 ते 12 वर्षे मुली 
दुहेरी (अंतिम) : जान्हवी फणसे-श्रीया शेलार (सिंबायोसिस, प्रभात रस्ता) वि.वि. निधी भांडारकर-सोहा कोठावळे (अभिनव इंग्रजी माध्यम) 11-8, 11-7, 11-5 
तिसरा क्रमांक : सारा सोनये-आकांक्षा मार्कंडे (मिलेनियम स्कूल, कर्वेनगर) वि.वि. ईरा जोगळेकर-अनुष्का मुखर्जी (अभिनव इंग्रजी माध्यम) 11-9, 11-4, 11-4 
एकेरी (अंतिम) : जान्हवी फणसे (सिंबायोसिस प्रशाला) वि.वि. श्रीया शेलार (सिंबायोसिस प्रशाला) 7-11, 11-5, 11-9, 11-9 
तिसरा क्रमांक : नभा किरकोळे (सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड) वि.वि. रेवा चव्हाण (सिंबायोसिस प्रशाला) 11-2, 11-4, 11-6.


​ ​

संबंधित बातम्या