कानामागून आला अन् तिखट झाला; पदार्पणात जेमीसनने दाखवली भारतीयांना जागा

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या आत्मविश्वासू फलंदाजांना त्याने चांगलाच इंगा दाखवला. त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीयांना मोठे धक्के दिले. भारताचे हुकमी आणि महत्त्वाचे खेळाडू असलेल्या मयांक अगरवाल, विराट कोहली आणि हनुमा विहारीला त्याने बाद करत भारतीयांची भांबेरी उडविली. 

वेलिंग्टन : नील वॅग्नर जर बायको सोबत घरी राहिला नसता तर कदाचित याला संघात जागाही मिळाली नसती. मात्र, मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे जर शिकायचे असेल तर फक्त केली जेमीसनकडूनच शिकायला हवे. एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली म्हणून त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले आणि त्याने पदार्पणातच कमाल करुन दाखविली. 

100 टेस्ट, 100 वाईन बाटल्या! याची मजा आहे राव

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या आत्मविश्वासू फलंदाजांना त्याने चांगलाच इंगा दाखवला. त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीयांना मोठे धक्के दिले. भारताचे हुकमी आणि महत्त्वाचे खेळाडू असलेल्या मयांक अगरवाल, विराट कोहली आणि हनुमा विहारीला त्याने बाद करत भारतीयांची भांबेरी उडविली. 

न्यूझूलंड नाणेफेक जिंकल्यावर त्यांनी किमान तीन फलंदाजांना बाद करण्याचा मानस ठेवला असणार आणि जेमीसनच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना भारताला तीन बाद 40 अशा बिकट परिस्थितीत अडकवता आले. त्याने चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि विराट कोहलीला बाद केले. या तिघांनाही त्याने सेट होण्याचाही वेळ दिला नाही. त्याने 14 षटकांमध्ये दोन षटके निर्धाव टाकत फक्त 38 धावा दिल्या आणि तीन फलंदाजांना बाद केले. 

कर्णधारपद सोडत नाही म्हणून आता त्याला हाकलून लावणार

पावसामुळे खेळ थांबविला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करावा लागला. दिवसाअखेर भारतीयांना पाच फलंदाजांच्या बदल्यात केवळ 122 धावा करता आल्या. पावसामुळे खेळ थांबला आणि परत सुरुच नाही झाला त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त 55 षटकांचा खेळ झाला. भारताकडून सध्या अजिंक्य रहाणे 38 आणि रिषभ पंत दहा धावांवर खेळत आहे. 
 
​ ​

संबंधित बातम्या