अँडरसनचा चेंडू ठरवला टिव्ही पंचांनी नोबॉल

संजय घारपुरे
Wednesday, 5 August 2020

मैदानावरील क्रिकेट पंचांचे काम अधिकच हलके करण्यास आयसीसीने सुरुवात केली आहे.

मँचेस्टर : मैदानावरील क्रिकेट पंचांचे काम अधिकच हलके करण्यास आयसीसीने सुरुवात केली आहे. आता त्यांनी फ्रंट फूट नोबॉल बाबतची सूचनाही दूरचित्रवाणी पंचच मैदानावरील पंचांना देतील असे सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत जेम्स अँडरसनने तीसाव्या षटकात टाकलेला चौथा चेंडू या प्रकारे नो बॉल ठरवण्यात आला. 

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

सचिन तेंडुलकर हा दूरचित्रवाणी पंचांनी धावचीत दिलेला पहिला खेळाडू ठरला होता, तर अँडरसन हा दूरचित्रवाणी पंचांनी नो बॉल ठरवलेला पहिला गोलंदाज ठरला आहे. आश्चर्य म्हणजे 2017 पासूनचा हा त्याचा केवळ दुसरा नो बॉल आहे. पदार्पणाच्या कसोटीत त्याचे पहिल्या तीन चेंडूत दोन नो बॉल होते. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

फ्रंट फूट नोबॉल तंत्रज्ञानाचा वापर आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेत सुरु झाला आहे. इंग्लंड - पाकिस्तान मालिकेद्वारे हे सुरु झाले आहे असे ट्वीट आयसीसीने केले आहे. अर्थात या कसोटीतील तंत्रज्ञानाने दिलेल्या निर्णयाचा आढावा घेऊनच अंतिम अंमलबजावणीबाबत निर्णय होणार आहे. गतवर्षीच्या भारत - विंडिज एकदिवसीय मालिकेच्यावेळी याची चाचणी झाली होती.   

पाच षटकात बारा नो बॉल चूकल्यामुळे
इंग्लंड - श्रीलंका मालिकेतील पाच षटकांच्या कालावधीत पंचांनी बारा फ्रंट फूट नो बॉल दिले नसल्याचे दूरचित्रवाणी प्रक्षेपकांनी नजरेस आणून दिले होते, तर गतवर्षीच्या ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान मालिकेत दोन सत्रात 21 नो बॉल देण्यात आले नाहीत, याकडे चॅनेल सेवनने लक्ष वेधले होते. इंग्लंड - विंडिज मालिकेतही हेच घडले असल्याचा दावा केला जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या