अँडरसनने टाकले मॅकग्राला मागे; कसोटीत 564 बळी

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ग्लेन मॅकग्राला मागे टाकले. 

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ग्लेन मॅकग्राला मागे टाकले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्याचा अखेरच्या दिवशी अँडरसनने भारताचा अखेरचा खेळाडू महंमद शमीला बाद करत 564 बळी घेण्याचा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा 563 बळींचा विक्रम मोडत संपूर्ण क्रिडाविश्वात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे स्थान पटकावले. या यादीत श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह प्रथम स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न 708 बळींसह दुसऱ्या तर भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे हा 619 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अँडरसन गेली तीन वर्ष जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर तो सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक 110 विकेट घेण्याचा विक्रमही अँडरसनच्या नावावर आहे. 

सामन्याच्या चौथ्या दिवशी अँडरसनने चेतेश्वर पुजाराला बाद करून मॅक्ग्रा यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्याने अखेरच्या सामन्यात एकूण पाच फलंदाजांना बाद केले.


​ ​

संबंधित बातम्या