जागतिक मैदानी स्पर्धा : जमैकाचा 55 सदस्यीय संघ जाहीर 

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

उसेन बोल्टचे पर्व दोन वर्षापूर्वी संपले तरी जमैकाचे जागतिक ऍथलेटिक्‍समधील स्थान अजून अढळ आहे. कारण महिला विभागात एलीन थॉम्पसन व शेली अन फ्रेझर-प्रिसे या दोघी महिला स्प्रिंटर जमैकाचा झेंडा दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दिमाखाने फडकवतील अशी आशा आहे. कारण जमैकाने स्पर्धेसाठी आपला 55 सदस्यीय संघ जाहीर केला. 

किंगस्टन (जमैका) : उसेन बोल्टचे पर्व दोन वर्षापूर्वी संपले तरी जमैकाचे जागतिक ऍथलेटिक्‍समधील स्थान अजून अढळ आहे. कारण महिला विभागात एलीन थॉम्पसन व शेली अन फ्रेझर-प्रिसे या दोघी महिला स्प्रिंटर जमैकाचा झेंडा दोहा येथे होणाऱ्या जागतिक मैदानी स्पर्धेत दिमाखाने फडकवतील अशी आशा आहे. कारण जमैकाने स्पर्धेसाठी आपला 55 सदस्यीय संघ जाहीर केला. 

या संघात शंभर व दोनशे मीटरची ज्युनिअर विश्‍वविजेती 17 वर्षीय ब्रायना विलीयम्सचाही समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी तिने उत्तेजक घेतल्याचे काही दिवसापूर्वी सिद्ध झाल्याने, तिची 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत चौकशी होणार आहे. असे असतानाही तिची निवड करण्यात आली. एलीन थॉम्पसन ही शंभर मीटर शर्यतीत विद्यमान ऑलिंपीक तर शेली माजी विश्‍व व माजी ऑलिंपीक विजेती आहे. दोघींच्या नावावर यंदा 10.73 सेकंद अशी संयुक्त वेगवान वेळ आहे. दोघी शंभर व दोनशे मीटर शर्यतीत सहभागी होणार आहेत. 
पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत माजी विश्‍वविजेत्या योहान ब्लेकवर जमैकाच्या आशा आहेत. याशिवाय 110 हर्डल्समधील विद्यमान ऑलिंपीक व विश्‍वविजेता ओमर मॅक्‍लोड, चारशे मीटरमध्ये शेरीका जॅक्‍सन यांच्याकडूनही पदकाच्या आशा आहेत. 

इथिओपीयानेही केला संघ जाहीर 
लांब पल्याच्या शर्यतीत केनियापुढे नेहमीच आव्हान निर्माण करणाऱ्या इथिओपीयानेही आपला 37 सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात पाच हजार मीटरमधील विद्यमान विजेता मुख्तार इद्रीस, दहा हजार मीटरमधील विजेती अल्माझ अयाना, यंदा ब्रुसेल्स येथील डायमंड लीग स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीतील विजेता गेटनेट वाले, महिलांच्या पंधराशे मीटर शर्यतीतील विश्‍वविक्रमवीर गेन्झेबे दिबाबा आणि माईल शर्यती मधील विश्‍वविक्रमवीर योमिफ कजेलचा यांचा समावेश आहे.


​ ​

संबंधित बातम्या