सायलीनं स्वत:समोर ठेवलंय 2 सेकंदाच टार्गेट!

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

कोरोनामुळे 2020 हे वर्ष वाया गेले. मात्र पुढील वर्ष नव्या उमेदीचे असेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.  ती म्हणाली की,  लॉकडाउनंतर मैदाने आणि जीम बंद झाल्या. त्यामुळे याकाळात सराव कायम ठेवून फिटनेस कायम ठेवणे मोठे आव्हान होते. हा काळ माझ्यासारख्या सर्वच खेळाडूंसाठी आणि प्रशिक्षकांसाठी आव्हानात्मक असाच होता.

कोरोनाच्या प्रादुर्भावानं जगाला चिंतेच्या गर्तेत नेऊन सोडलं. जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील छोट्या मोठ्या राष्ट्रांवर लॉकडाउनची नामुष्की ओढावली. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. खेळाडू आणि खेळाची मैदाने याला अपवाद नाहीत. जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक गेम्स पुढे ढकलल्या. प्रत्येक खेळाला लॉकडाउनचा मोठा फटका बसला.

खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी हा काळ खूप कसोटीचा होता. आता हळूहळू खेळ पूर्ववत होत आहे. आणि खेळाडून नव्या जिद्दीनं मैदानात उतरत आहेत. राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणारी धावपट्टू  सायली वाघमारे हिनेही आता कसून सराव सुरु केला आहे. स्वत:समोर टार्गेट सेट करुन ती सराव करत आहे. सकाळला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये धावपट्टू सायली वाघमारेनं लॉकडाउनच्या काळात सरावासाठी केलेल्या कसरतीची गोष्ट सांगितली.

कोरोनामुळे 2020 हे वर्ष वाया गेले. मात्र पुढील वर्ष नव्या उमेदीचे असेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.  ती म्हणाली की,  लॉकडाउनंतर मैदाने आणि जीम बंद झाल्या. त्यामुळे याकाळात सराव कायम ठेवून फिटनेस कायम ठेवणे मोठे आव्हान होते. हा काळ माझ्यासारख्या सर्वच खेळाडूंसाठी आणि प्रशिक्षकांसाठी आव्हानात्मक असाच होता.

कोहलीला हटवा; टीम इंडियाच्या फ्लॉपशोनंतर हिटमॅनचा ट्रेंड

प्रशिक्षकांनी आम्हाला वेळापत्रक दिले होते. रस्त्यावर धावणे शक्य नसल्यामुळे अनेकांना अंगणात आणि टेरेसवर सराव करण्याची वेळ आली. मातीच्या मैदानातील सरावाच्या तुलनेत टेरेससारख्या हार्ड फेसवर सराव करताना दुखापत होण्याची भीती असायची. कणखर मानसिकता ठेवून फिटनेस कायम ठेवणे यावरही फोक दिला. आता भूतकाळ विसरुन नव्या दमाने तयारी करावी लागणार आहे. आगामी वर्षात शर्यत पूर्ण करताना 2 सेकंद वेळ कमी करण्याचे टार्गेट ठेवले आहे, असेही तिने सांगितले.  

​ ​

संबंधित बातम्या