जॅक कॅलिस, झहीर अब्बास व लिसा स्थालेकर यांना आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान  

टीम ई-सकाळ
Sunday, 23 August 2020

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी फलंदाज झहीर अब्बास आणि पुणे येथे जन्मलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या माजी कर्णधार लिसा स्थालेकर यांना आज रविवारी आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिले आले.

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी फलंदाज झहीर अब्बास आणि पुणे येथे जन्मलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या माजी कर्णधार लिसा स्थालेकर यांना आज रविवारी आंतराराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिले आले.

जॅक कॅलिस यांची क्रिकेट कारकीर्द -  
जॅक कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व करताना, 55.37 च्या सरासरीने 13,289 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 45 शतक आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय जॅक कॅलिसने कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 292 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 328 एकदिवसीय सामन्यांमध्ये जॅक कॅलिसने 44.36 च्या सरासरीने 17 शतक आणि 86 अर्धशतकांच्या मदतीने 11,579 धावा केल्या आहेत. व एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील  कॅलिसने 273 विकेट्स मिळवल्या आहेत. तर, आपल्या संपूर्ण क्रिकेट मधील कारकिर्दीत जॅक कॅलिसने 25 टी-20 सामन्यांमध्ये देखील भाग घेतला आहे. 

झहीर अब्बास यांची क्रिकेट कारकीर्द -  
त्यानंतर, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी 78 कसोटी आणि 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये त्यांनी 5062 धावा केल्या असून, 12 शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय प्रकारात 2572 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये झहीर अब्बास यांनी 7 शतक आणि 13 अर्धशतक झळकावले आहेत.    

लिसा स्थालेकर यांची क्रिकेट कारकीर्द - 
तर, पुण्यात जन्मलेल्या लिसा स्थालेकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची धुरा सांभाळली आहे. शिवाय एकदिवसीय सामन्यांत सर्वात पहिल्यांदा 1000 धावा आणि 100 विकेट्स घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लिसा स्थालेकर यांनी ८ कसोटी आणि 125 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी प्रकारात 32 च्या सरासरीने 416 धावा केल्या असून, यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एकदिवसीय क्रिकेट मध्ये 30.65 च्या सरासरीने 2 शतक व 16 अर्धशतक केले आहेत.      

कोरोनाच्या संकटामुळे आयसीसीने हा सोहळा व्हर्चुअल आयोजित केला होता. यावेळेस कॅलिसचा दीर्घ काळचा सहकारी शॉन पोलॉक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर उपस्थित होते. या सोहळ्यात  झहीर अब्बास यांना 'एशियन ब्रॅडमन' म्हणून गौरविण्यात आले. 


​ ​

संबंधित बातम्या