भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

ऑस्ट्रेलिया आणि आफगाणीस्तान मध्ये खेळला जाणार एकमेव कोसोटी सामना 21 ते 25 जून दरम्यान खेळला जाणार आहे,

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसच्या काळात क्रिकेट पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आफगाणिस्तान सोबत एख कसोटी सामना तसेच भारतासोबत चार कोसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोरोना व्हायरस माहामारीमुळे मार्चनंतर जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, जगातील बहुतांश देशामध्ये लॉकडाऊन चालू आहे. यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीने जाहिर केले आहे, स्पर्धेचा पहिला सामना ब्रिसबेन मध्ये खेळण्यात येणार आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि आफगाणीस्तान मध्ये खेळला जाणार एकमेव कोसोटी सामना 21 ते 25 जून दरम्यान खेळला जाणार आहे, ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथे खेळला जाणार हा सामना दिवस-रात्र खेळला जाणार आहे. तर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान मालिका 3 डिसेंबर पासून खेळण्यात येणार आहे. मालिकेचा पहिला सामना ब्रिसबेन येथे खेळण्यात येईल तर दुसरा सामना हा 11 ते 15 डिसेंबर दरम्यान बीच एडिलेड ओवल मैदाणावर खेळण्यत येणार आहे, हा सामना दिवस-रात्र खेळला जाणार आहे. तीसरा सामना हा 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न तर शेवटचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळण्यात येणार आहे. 

 

 

भारतीय क्रिकेट सघाने मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यन कसोटी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली होती. भारतीय संघाने इतिहास घडवत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. या दौऱ्या दरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्वतःकडेच ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या