दबस, भामिदिप्तीचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 December 2018

डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित गद्रे मरिन करंडक आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती तर मुलांच्या गटात सुशांत दबसने मानांकित खेळाडूंना हरवून उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.

पुणे : डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित गद्रे मरिन करंडक आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती तर मुलांच्या गटात सुशांत दबसने मानांकित खेळाडूंना हरवून उद्‌घाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात भारताच्या श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्तीने सातव्या मानांकित कोरियाच्या चाई ह्युन सिमचा 6-1, 6-2 असा पराभव केला. शरण्या गवारेने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पूजा इंगळेवर 6-1, 6-2 असा, सहाव्या मानांकित सालसा आहेरने लकी लुझर ठरलेल्या मालविका शुक्‍लावर 6-2, 6-3 असा, क्वालिफायर गार्गी पवारने ऋतुजा चाफळकरवर 6-2, 6-1 असा विजय मिळविला. अव्वल मानांकन असलेल्या शिवानी अमिनेनीने मुस्कान गुप्ताला 6-2, 7-6(1) असे तर तैपेईच्या यु-यून लीने प्रियांशी भंडारीला 6-3, 6-0 असे पराभूत केले.

मुलांच्या गटात भारताच्या सुशांत दबसने बल्जेरियाच्या आठव्या मानांकित रोमेन फॅकोनचा 6-4, 6-2 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित सिद्धांत बांठियाने गिरीश चौगुलेला 6-1, 6-0 असे, भारताच्या आर्यन भाटियाने मलेशियाच्या दर्शन सुरेशला 6-1, 6-3 असे नमविले.

या स्पर्धेचे उद्‌घाटन डेक्कन जिमखाना क्‍लबचे ज्येष्ठ सभासद आणि माजी प्रशिक्षक वासुदेव घाटे आणि गद्रे मरिन्स एक्‍स्पोर्टच विभागीय वितरण व्यवस्थापक आश्विनकुमार जंगम यांच्या हस्ते झाले. या वेळी डेक्कन जिमखाना क्‍लबचे मानद सचिव विश्वास लोकरे, फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार, स्पर्धा संचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर लीना नागेशकर हे उपस्थित होते.

निकाल असे :

मुले : जण वाजदेमाजर (पोलंड) वि.वि. अनर्घ गांगुली (भारत) 6-0, 6-1; संजीत देवीनेनी (यूएसए) वि.वि. आदित्य बलसेकर (भारत) 6-3, 3-6, 7-5; सच्चीत शर्मा (भारत) वि.वि. अर्थव निमा (भारत) 6-1, 6-1; क्रिश पटेल (भारत) वि.वि. नथ्यूत एन. (थायलंड) 7-6(4), 6-4; रयुही अझूमा (जपान) वि.वि. फैज नस्याम (भारत) 6-4, 6-2; देव जाविया (भारत) वि.वि. तेजस्वी मेहरा (भारत) 6-2, 6-2; पीटर पावलक (पोलंड) वि.वि. अमन पटेल (भारत) 6-3, 6-1; लॅन्सलॉट कार्नेलो (स्वीडन) वि.वि. सुहित रेड्डी लंका (भारत) 6-3, 6-2; कसीदीत समरेज (थायलंड) वि.वि. प्रसन्ना बागडे (भारत) 6-4, 3-6, 6-3; डेनिम यादव (भारत) वि.वि. तायो हिरानो (जपान) 6-4, 6-1; माधवीन कामथ (भारत) वि.वि. अरुण गुरुस्वामी (यूएसए) 6-2,
6-3.


​ ​

संबंधित बातम्या