'माझ्या बढतीची कल्पनाही सचिन पाजींची होती'

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

2005 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात इरफान पठाणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते.

मुंबई :  भारतीय संघाचा माजी क्रिकेट इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इरफान पठाणला फलंदाजीत बढती मिळाली होती. तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यामुळे पठाणला प्रमोशन मिळाल्याची चर्चा त्यावेळी क्रिकेट वर्तुळात रंगल्याचेही पाहायला मिळाले होते. या प्रयोगामुळेच इरफान पठाणचे करियर उद्धवस्त झाले, असेही बोलले गेले. यावर इरफानने आता खुलासा केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत मिळालेल्या बढतीमागे सचिनचा हात होता, असे पठाणने म्हटले आहे.  2005 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपूरच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यात इरफान पठाणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले होते.

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन

या संधीचा फायदा उठवत इरफानने 70 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंकन संघाला 152 धावांनी धुव्वा उडवला होता. इरफान पठाणला बढतीची संधी देण्यामागे भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांची कल्पना होती, असे क्रिकेट वर्तुळातील काहीजणांचा समज आहे. हा केवळ गैरसमज होता हेच पठाणच्या वक्तव्यामुळे समोर येते. रोनक कपूरशी संवाद साधताना इरफान म्हणाला की, फलंदाजीमध्ये माझ्याबाबत जो प्रयोग करण्यात आला त्यामागे ग्रेग चॅपल यांची काहीही भूमिका नव्हती. सचिन पाजींमुळे मला तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली होती.

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'

नव्या चेंडूवर फटकेबाजी करण्याची माझ्यात क्षमता असल्याचे सांगत सचिनपाजींना राहुल द्रविडला सल्ला दिला होता. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मला बढती मिळाली. या प्रयोगामुळे ग्रेग चॅपल यांनी इरफान पठाणचे करियर उद्धवस्त केल्याचेही बोलले जाते. या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही, असेही पठाणने यावेळी स्पष्ट केले.  पठाण पुढे म्हणाला की, मुथय्या मुरलीधरन चांगल्या लयीत गोलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूने दिलहारा फर्नांडो गोलंदाजी करत होता. या परिस्थितीत क्रमवारीत बदल करण्याची रणननिती आखण्यात आली. मला फलंदाजीला बढती देण्याचा प्लॅन आखला गेला, असे सांगत ग्रेग चॅपल भारतीय नाहीत त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण आरोप करणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाला. 


​ ​

संबंधित बातम्या