ईशान किशनने केला धोनीसारखा 'Blind runout'

वृत्तसंस्था
Wednesday, 5 September 2018

भारतीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण म्हटले की महेंद्रसिंह धोनीचे नाव सर्वप्रथम येते. त्याच्यासारखे यष्टीरक्षण भारतीय क्रिकेटमध्ये कदाचितच कोणाला करता येते. सध्या सुरु असलेल्या दुलिप करंडकात मात्र झारखंडच्याच ईशान किशनने धोनीच्या 'Blind runout' ची पुनरावृत्ती करत फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण म्हटले की महेंद्रसिंह धोनीचे नाव सर्वप्रथम येते. त्याच्यासारखे यष्टीरक्षण भारतीय क्रिकेटमध्ये कदाचितच कोणाला करता येते. सध्या सुरु असलेल्या दुलिप करंडकात मात्र झारखंडच्याच ईशान किशनने धोनीच्या 'Blind runout' ची पुनरावृत्ती करत फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

रिकी भुई फलंदाजी करत असताना त्याने एक धाव चारण्याचा प्रयत्न केला. समोरुन अनमोलप्रित सिंगनेही त्याला दाद येत धाव पूर्ण केली मात्र त्यांना बाद करण्याची संधी आहे असे वाटून ईशान किशन चेंडू पकडण्यासाठी धावपट्टीवर आला. त्याने चेंडू पकडला मात्र तो वळून न मारता त्याने तो तसाच स्टंपच्या दिशेने फेकला आणि धोनीच्या 'Blind runout' ची पुनरावृत्ती केली. 

धोनी त्याच्या कुशल यष्टीरक्षणामुळे संपूर्ण क्रिडाविश्वात प्रसिद्ध आहे. त्याने 2016मध्ये न्युझीलंडविरुद्ध खेळताना Blind runout केला होता. त्यावेळी त्याने रॉस टेलरला धावबाद केले होतेDuleep Trophy, Ishan Kishan, MS Dhoni, Blind Runout.

 


​ ​

संबंधित बातम्या