धर्मानुसार होणारा भेदभाव हा देखील वर्णभेदच-इरफान पठाण

टीम ई-सकाळ
Wednesday, 10 June 2020

आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने देखील वर्णभेदाच्या मुद्द्यावर भाष्य केले. धर्माबाबत केला जाणारा भेदभाव हा वर्णभेद असल्याचेच त्याने म्हटलंय.  

जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेत सुरु झालेले ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सध्या जगभर चालू झाले असून, यामध्ये अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवत, वर्णभेदाविरुद्ध आपले वैयक्तिक मत व्यक्त करत आहेत. तर काही खेळाडूंनी आपल्यासोबत घडलेल्या वर्णभेदाच्या आठवणी जगासमोर ठेवल्या आहेत. यामध्ये नुकत्याच वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनंतर डॅरेन सॅमी याने इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील सामन्यांच्या वेळेस आपल्याला असा अनुभव आल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने देखील वर्णभेदाच्या मुद्द्यावर भाष्य केले. धर्माबाबत केला जाणारा भेदभाव हा वर्णभेद असल्याचेच त्याने म्हटलंय.  

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ हे आंदोलन सुरु झाले.  या आंदोलनाच्या समर्थनात क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील पुढे येत  असून, वर्णभेदाविरुद्ध निषेध नोंदवत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने देखील वर्णभेदावर बोट ठेवत धर्माच्या आधारावर करण्यात येणारा भेदभाव हा देखील वर्णभेदाचाच प्रकार असल्याचे म्हटले आहे. वर्णभेदाच्या मुद्द्यावर भाष्य करताना इरफान पठाणने ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करत वेगळ्या धर्माचे असल्या कारणामुळे घर खरेदी करू न देणे हा देखील वर्णभेद असल्याचे म्हटले आहे. यासोबतच इरफानने या ट्विटमध्ये हॅशटॅगचा वापर करत #convenient म्हणजे सोयीस्कररीत्या असे लिहिले आहे. त्यामुळे इरफानच्या या ट्विटनंतर आता धर्माच्या आधारावर होणारा भेदभाव देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.       

कोरोनामुळ ICC ने बदललेल्या नियमाचा फायदा तोटा कुणाला?

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळत असताना     स्वतःला आणि श्रीलंकन क्रिकेटपटू थिसारा परेराला वर्णभेदाचा सामना करावा लागल्याचे म्हटले होते. यासोबतच ख्रिस गेलने देखील वर्णभेदाच्या मुद्दयावर प्रतिक्रिया देताना वर्णभेदासंदर्भात स्वतः देखील अनुभवल्याचे सांगत फुटबॉल पासून क्रिकेटमध्ये सर्वच ठिकाणी काही प्रमाणात वर्णभेद केला जात असल्याचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियाचा क्रीडापटू अँड्रू सायमंडने देखील यापूर्वी वर्णभेदाच्या मुद्द्याचा शिकार झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता इरफान पठाणने केलेल्या या टिप्पणीवर वर्णभेदाप्रमाणेच धर्मात होणारा भेदभावाचा मुद्दा समोर आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या