इरफानने साधला माजी कर्णधार धोनीवर निशाणा, वाचा नमके काय आहे प्रकरण

टीम ई-सकाळ
Monday, 1 June 2020

पण त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालीच नाही. एकदिवसीयप्रमाणेच कसोटी संघातही त्याला स्थान मिळाले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतानाही त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. खुद्द इरफान पठाणने याबाबतची खंत बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांने कारकिर्दीला ब्रेक लागण्यास धोनी जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला उत्कृष्ट अष्टपैलूपैकी एक म्हणजे इरफान पठाण. 2012 मध्ये इरफान पठाणने राष्ट्रीय संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 28 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या. एवढेच नाही तर आपल्या 10 षटकांच्या कोट्यात 61 धावा खर्च करुन प्रतिस्पर्धांच्या अर्धा संघ तंबूत धाडला. पण त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालीच नाही. एकदिवसीयप्रमाणेच कसोटी संघातही त्याला स्थान मिळाले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतानाही त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. खुद्द इरफान पठाणने याबाबतची खंत बोलून दाखवली आहे. यावेळी त्यांने कारकिर्दीला ब्रेक लागण्यास धोनी जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.   

श्रीलंका क्रिकेट संघाची सोमवार पासून सरावाला सुरुवात
 

इरफान पठाणने नुकतीच स्पोर्टस् तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या कारकिर्दीतील अनेक गोष्टींना उजाळा दिला. यावेळी त्याने निवड समिती आणि तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. इरफान म्हणाला की, अखेरच्या वनडे आणि टी-20 सामन्यात सामनावीर ठरलो होतो. ऋदिमान साहा क्रिकेट न खेळता संघासोबत राहिला. त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतने 200 धावा केल्या. पण तरीही साहाला संधी मिळाली. भारतीय क्रिकेट संघात काहीजण खूप नशिबवान असतात तर काहींच्या पदरी निराशा येते, अशा शब्दांत त्याने निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.   

हॉकी इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; 14 दिवसांसाठी कार्यालय बंद ठेवणार 

2008 मध्ये महेंद्रसिंह धोनीने इरफानच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. इरफानच्या गोलंदाजीत धार दिसत नाही, असे धोनीने म्हटले होते. याप्रश्नावरही इरफानने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवेळी धोनीने इरफानच्या गोलंदाजीतील लय हरपल्याचे म्हटले होते. यावेळी मी योग्य गोलंदाजी करत असल्याचे सांगत कोणती सुधारणा अपेक्षिक आहे याविषयी कर्णधार धोनीशी बोलल्याचे त्याने सांगितले. सर्व काही ठिक असल्याचे उत्तर धोनीने मला दिले होते, असेही तो म्हणाला.  2008 मध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही मला ड्रॉप करण्यात आले. मॅच विनरला कोणताही संघ बाहेर ठेवत नाही. पण माझ्या बाबतीत हा प्रकार घडला, असे सांगत त्याने नाव न घेता धोनीवर निशाणा साधला.

या स्पर्धेनं याठिकाणी रंगणार 'फॉर्म्युला वन रेस'चा थरार; पण...

इरफान पठाणने 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याने एकूण 301 बळी टिपले आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. यावर्षीच्या जानेवारीमध्ये इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.  


​ ​

संबंधित बातम्या