खेळाडूंना बूट शिवून देणारा झालाय बेरोजगार; इरफानकडून मोलाची मदत

टीम ई-सकाळ
Tuesday, 16 June 2020

देशव्यापी लॉकडाउनमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या आणि मध्यम वर्गातील व्यापार उद्योगाला बसला आहे.  

चेन्नई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जन-जीवन विस्कळीत झाले आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात फोफावलेल्या या महा साथीच्या रोगामुळे व्यापार-व्यवसाय ठप्प झालाय. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करत सक्तीने सोशल डिस्टन्सिंगचा मार्ग अवलंबला. सध्याच्या घडीला जगभरातील अनेक देश याच मार्गाचा अवलंब  करत आहेत. देशव्यापी लॉकडाउनमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका  छोट्या आणि मध्यम वर्गातील व्यापार उद्योगाला बसला आहे.

सुशांतच्या आयुष्यातील ते अधुरं स्वप्नं धोनीमुळं झालं पूर्ण!

क्रिडा क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लोकांनाही याची झळ सोसावी लागत आहे.  आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यामुळे चन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना बूट शिलाई करुन देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आर भास्करन यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खेळ बंद असल्यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच इरफान पठाणने त्यांना 25 हजार रुपयांची मदत केली. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आर भास्करन यांच्या कुटुंबियांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मदतीला धावत इरफान पठाणने दाखवलेल्या माणूसकीचा किस्सा रौनक कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला.

क्रिकेटर बहिणीमुळेच सुशांतला या खेळात विशेष रुची निर्माण झाली होती

भास्करन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात इरफान पठाणने त्यांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. या पैशामुळे घरात आवश्यक असणारे सामान खरेदी करणे शक्य झाले. गरजेच्या वेळी इरफान पठाण यांच्याकडून मिळेलाला मदतीचा हात मोलाचा आहे. ही रक्कम परत द्यायची आहे. पण क्रिकेट लवकर सुरु झाले नाही तर संकट आणखी गडद होईल, अशी भीतीही भास्करन यांनी व्यक्त केली.  
एखाद्या खेळाडूने क्रिकेटशी संबंधीत स्टाफमधील कर्मचाराला मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2019 मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आकाश चोप्रा यांच्यासह इरफान पठाणने रसोईमध्ये काम करणाऱ्या एकाची मदत केली होती. कोरोनाजन्य लढाईतही इरफानने आपल्यातील दिलदारी दाखवून देत अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी मदतीचा हात दिला होता. 


​ ​

संबंधित बातम्या