SRH vs RCB: चहलचा शतकी विक्रम; कोहली-एबीच्या पक्तींत झाला सामील

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 14 April 2021

2011 मध्ये युजवेंद्र चहलला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले होते. 2013 च्या हंगामापर्यंत तो मुंबई इंडियन्ससोबत होता. या कालावधीत त्याला केवळ 1 सामन्यात संधी मिळाली.

SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आरसीबीकडून 100 सामने खेळणारा युजवेंद्र चहल हा तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी रॉयल चॅलेंजर्सकडून 100 सामने खेळण्याचा टप्पा पार केलाय. युजवेंद्र चहल 2014 मध्ये बंगळुरुच्या संघात सामील झाला होता. त्याने 99 सामन्यात 121 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. 

2011 मध्ये युजवेंद्र चहलला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले होते. 2013 च्या हंगामापर्यंत तो मुंबई इंडियन्ससोबत होता. या कालावधीत त्याला केवळ 1 सामन्यात संधी मिळाली. यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहलला एकही विकेट मिळाली नव्हती. मुंबई इंडियन्सविरुद्ध 4 षटकात त्याने 41 धावा खर्च केल्या होत्या. आयपीएलच्या कारकिर्दीत त्याने दोन वेळा चार विकेट घेतल्या आहेत. 2016 च्या हंगामात 25 धावा खर्च करुन घेतलेल्या 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या हंगामात त्याने 13 सामन्यात 21 विकेट घेतल्या होत्या. युएईमध्ये रंगलेल्या स्पर्धेत 15 सामन्यात त्याला 21 विकेट मिळाल्या होत्या. 

IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाजाला कोरोना

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी केली. विराट कोहली आणि मॅक्सवेल वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बंगळुरुचा संघ 149 धावांतच आटोपला.


​ ​

संबंधित बातम्या