IPL 2020: यॉर्करनं प्रतिस्पर्ध्यांना रोखणारा आईला चिकन विकण्यापासून थांबवू शकत नाही

सुशांत जाधव
Wednesday, 30 September 2020

नटराजनचे मेंटर जयप्रकाश यांनी एका मुलाखतीमध्ये त्याच्यासंदर्भातील एक खास किस्सा शेअर केला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना ज्या व्यवसायाने कुटुंबियांना आधार दिला तो व्यवसाय आता सोडून कसा चालेल, असे त्याच्या आईचे मत आहे. त्यामुळे त्या आजही आपला पूर्वीचा व्यवसाय अगदी पूर्वीप्रमाणेच करतात.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धा ही युएईच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. देशी-परदेशी मिसळ असलेल्या आयपीएल लीगमध्ये भारतीय नवोदित चेहरे लक्षवेधी खेळ करताना पाहायला मिळत आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील एन नटराजन हा लक्षवेधी नवोदित चेहऱ्यापैकी एक आहे. सध्याच्या घडीला त्याच्याकडे आर्थिक बाबीत कोणतीही कमी नसली तरी त्याची आई आजही चिकव विक्रीचा व्यवसाय करते. नटराजनला आईने रस्त्यावर चिकन विकू नये, असे वाटत असले तरी तो आपल्या आईला यापासून थांबवू शकत नाही.  

IPL 2020 खिल्ली उडवलेला तेवतिया झाला हिरो

नटराजनचे मेंटर जयप्रकाश यांनी एका मुलाखतीमध्ये त्याच्यासंदर्भातील एक खास किस्सा शेअर केला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असताना ज्या व्यवसायाने कुटुंबियांना आधार दिला तो व्यवसाय आता सोडून कसा चालेल, असे त्याच्या आईचे मत आहे. त्यामुळे त्या आजही आपला पूर्वीचा व्यवसाय अगदी पूर्वीप्रमाणेच करतात.  नटराजन हा डेथ ओव्हरमध्ये घातक गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. सध्याच्या स्पर्धेपूर्वी त्याने आयपीएल हंगामात खेळताना प्रतिस्पर्धी संघातील दिग्गज खेळाडूंना आपल्या यॉर्करने रोखत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.  क्रिकेटमध्ये विशेष ओळख मिळाल्यानंतर नटराजन याने आई-वडिलांसाठी घर बांधले. आपल्या बहिणींच्या शिक्षणाची व्यवस्था केली. तामिळनाडूतील सलेम जिल्ह्यातील चिन्नापामपट्टी येथे अकादमी सुरु करुन खेळात रुची असलेल्या सहकाऱ्यांना खेळीतील आवड कायम ठेवण्याची प्रेरणा दिली. या सर्व गोष्टी त्याने  तामिळनाडूच्या संघाकडून खेळत असताना केल्या. 

IPL 2020 : अशक्‍य ते शक्‍य... पुरनची कहानी
 

त्याचे मेंटर जयप्रकाश यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले. त्याच्या कामगिरीने आश्चर्य वाटत नाही. यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली आहे. अनेक अडचणींचा सामना करुन तो इथपर्यंत पोहचला आहे. दुखापतीतून सावरत त्याने तमिळनाडूच्या संघात स्थान मिळवले. त्यानंतर आता तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसत आहे.   2017 मध्ये किंग्ज इलेव्हनने नटराजनसाठी 3 कोटी मोजून आपल्या ताफ्यात सामील केले होते. या हंगामात त्याने खास छाप सोडली नव्हती. 2018 मध्ये त्याचा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात समावेश झाला. यंदाच्या हंगामात तो लयीत दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.  दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 14 आणि 18 व्या षटकात त्याने भन्नाट यॉर्करचा मारा केल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेटलीही त्याच्या यॉर्करने प्रभावित केला.
 


​ ​

संबंधित बातम्या