IPL स्पर्धेत पहिला चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाचा हा विक्रम अद्यापही अबाधित!

सुशांत जाधव
Wednesday, 16 September 2020

2008 मध्ये बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आणि राहुल द्रविड कर्णधार असलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आणि परदेशी खेळाडूंची मिसळ असलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात परदेशी गड्याच्या शतकी खेळीच्या जोरावर दादाच्या संघाने मिस्टर रिलायबलच्या संघाला तब्बल 140 धावांनी पराभूत केले होते.

पुणे, क्रीडा डेस्क:  भारतीय क्रिकेटच्या मैदानातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामातील स्पर्धा 19 सप्टेंबरपासून युएईत सुरु होतेय. 2008 मध्ये बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आणि राहुल द्रविड कर्णधार असलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आणि परदेशी खेळाडूंची मिसळ असलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात परदेशी गड्याच्या शतकी खेळीच्या जोरावर दादाच्या संघाने मिस्टर रिलायबलच्या संघाला तब्बल 140 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या ब्रॅडम मॅक्युलमने 158 धावांची नाबाद खेळीच्या जोरावर कोलकाताने निर्धारित षटकात 3 बाद 222  धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना  बंगळुरुचा संघ 15.1 षटकात  82 धावातच गारद झाला होता. 

ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी

आयपीएल स्पर्धेतील शुभारंभाच्या सामन्यातील पहिला चेंडू खेळण्याचा मान हा तत्कालीन कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणारे आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नावे आहे. आयपीएल 2008 च्या पहिल्या सामन्यात त्यांनी ब्रॅडम मॅक्युलमसोबत संघाच्या डावाला सुरुवात केली होती. दुसऱ्या बाजूनं प्रविण कुमारनं या स्पर्धेतील पहिला चेंडू फेकला होता.  आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक   निर्धाव षटके टाकण्याचा विक्रम हा प्रवीण कुमारच्या नावे आहे. 119 सामन्यात त्याने 1,076 चेंडू निर्धाव फेकले आहेत. सर्वाधिक 14 षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. त्याच्या पाठोपाठ इरफान पठाण 10 निर्धाव षटकांसह दुसऱ्या तर धवन कुलकर्णी, लसिथ मलिंगा, संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 8-8 निर्धाव षटके टाकली आहेत.  

IPL2020: मुंबई की चेन्नई ; गंभीरने सांगितलं कोण ठरणार वरचढ?

2008 ते 2010 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर पुढील तीन वर्षे म्हणजे 2011 ते 2013 च्या हंगमात प्रवीण कुमार किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर 2014 च्या हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळल्याचे पाहायला मिळाले. 2015 मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद तर 2016 ते 2017 या दोन हंगामात तो गुजरात लायन्सकडून मैदानात उतरला होता. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघाकडून त्याने 119 सामने खेळले असून 3,251 धावा खर्च करत त्याने 90 विकेट्स घेतल्या आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या