IPL2020 : नेतृत्वबदलानंतर इयॉन मॉर्गनची आज हैदराबाद विरुद्ध परीक्षा    

टीम ई-सकाळ
Sunday, 18 October 2020

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. याअगोदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्सने पराभूत केले होते. तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाला चेन्नई सुपर किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे प्लेऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी या दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे. 

यंदाच्या आयपीएल मध्ये या दोन्ही संघांचे आत्तापर्यंत आठ-आठ सामने झाले असून, त्यांपैकी कोलकाता नाईट रायडर्स संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. आणि सनरायझर्स हैदराबाद संघाने तीन सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आज हे दोन्ही संघ अबुधाबीच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. या सामन्याआधी फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर कोलकाताला दिलासा मिळाला आहे. मात्र हैदराबादविरुद्धच्या आजच्या सामन्यात सुनील नरेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात येणार नाही.  

यावर्षीच्या स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये आज दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. शेवटच्या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळविला होता. याशिवाय आयपीएलमध्ये आत्तापर्यंत हे दोन्ही संघ हेड टू हेड 18 वेळा एकमेकांना भिडले असून, यात कोलकाता संघाने 11 तर हैदराबादने 7 विजय मिळविला आहे. 

सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

कोलकाताचा संघ : 
शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, लोकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव. 

हैदराबादचा संघ : 
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर, अभिषेक शर्मा, राशिद खान, शाहबाज नदीम, खलील अहमद, संदीप शर्मा, टी नटराजन


​ ​

संबंधित बातम्या