ऑलिम्पिक गेममध्ये टी-20 क्रिकेटचा थरार रंगायला पाहिजे: राहुल द्रविड

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 13 November 2020

क्रिकेटला सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळण्यासाठी या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला टी-20 क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भात कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. यासंदर्भातील निर्णय हा संपूर्णत: आयसीसीवर अवलंबून असेल.  
 
क्रिकेटच्या विस्तारासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडणारे भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी ऑलिम्पिक गेममध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा, अशी इच्छा व्यक्त केलीय. टी-20 क्रिकेट प्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करावा. भविष्यात ते शक्य झाले तर ते मोठे यश असेल, असे द्रविड यांनी म्हटले आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात द्रविड सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी क्रिकेटच्या विस्तारासंदर्भातील अनेक मुद्यावर भाष्य केले.

IPL 2020: कोहली-पॉटिंग यांच्यात रंगला होता स्लेजिंगचा खेळ; अश्विनने केला खुलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकप्रिय स्पर्धा युएईमध्ये घेण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. बीसीसीआयने ती परदेशात यशस्वीपणे पार पाडली. यावर भाष्य करताना राहुल द्रविड यांनी युएईतील खेळपट्टीसंदर्भातही भाष्य केले. आयपीएलच्या यशस्वी नियोजनात खेळपट्टीही महत्त्वाची ठरली. सर्व ठिकाणी अशीच सुविधा असायला हवी, असे ते म्हणाले.

बोला था आपको मामू, इनकी गणित वीक है; रोहितची ट्विटरवर फटकेबाजी

क्रिकेटला सर्व स्तरातून प्रोत्साहन मिळण्यासाठी या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला टी-20 क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भात कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. यासंदर्भातील निर्णय हा संपूर्णत: आयसीसीवर अवलंबून असेल.  
 
​ ​

संबंधित बातम्या