SRHvsKKR Super Over फर्ग्युसन ठरला हिरो, अवघ्या 7 चेंडूचा खेळ!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी तीन चेंडूत विषय संपवत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.  

Hyderabad vs Kolkata, 35th Match Super Over : आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना टाय झाला. यंदाच्या हंगामातील सुपर ओव्हरमध्ये गेलाला हा तिसरा सामना ठरला. सुपर ओव्हरच्या नियमानुसार धावांचा पाठलाग करणारा सनरायझर्स हैदराबाद संघाची जोडी बॅटिंगला उतरली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयस्ट्रो मैदानात उतरल्यानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने  सामन्यात लक्षवेधी गोलंदाजी करणाऱ्या लॉकी फर्ग्युसनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने दोन धावा खर्च करुन तीन चेंडूतच हैदराबादला आटोपले. दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी तीन चेंडूत विषय संपवत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.  

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 163 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने चांगली सुरुवात केली. सलामीवीर केन विलियमसन आणि जॉनी बेयरस्टोरनं अर्धशतकी पार्टनरशिप केली. मध्यफळीतील फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कर्णधार वॉर्नर-समद यांनी 33 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकात 18 धावा हव्या असताना वॉर्नरने रसेलच्या गोलंदाजीवर 17 धावा काढत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. 

पहिला चेंडू : लॉकी फर्ग्युसननं डेव्हिड वॉर्नरचा उडवसा त्रिफला
दुसरा चेंडू : अब्दुल समदन घेतल्या दोन धावा
तिसरा चेंडू : फर्ग्युसनंन समदच्याही उडवल्या दांड्या 

कोलकातासमोर विजयासाठी 3 धावांचे लक्ष्य  

सनरायझर्स हैदराबादकडून राशिदला गोलंदाजी 

चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत कोलकाताचा सुपर विजय

दिनेश कार्तिकन तिसरा चेंडू खेळून काढला

दुसऱ्या चेंडूवर इयॉन मॉर्गनने घेतली 1 धावा

राशिदनं पहिला चेंडू टाकला निर्धाव
 

 


​ ​

संबंधित बातम्या