सीमारेषेवर फर्ग्युसन-गिलमध्ये दिसला कमालीचा ताळमेळ (VIDEO)

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 19 व्या षटकात शिवम मावी गोलंदाजी करत होता. त्याच्या अखेरच्या चेंडूवर अब्दुलने उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण...

लॉकी फर्ग्सुसनच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा हातून निसलटेलाल सामना जिंकला. लॉकी फर्ग्युसनने सुपर ओव्हरमधील दोन आणि सामन्यातील तीन बळींसह एकूण 5 विकेट्स घेतल्या. गोलंदाजीशिवाय त्याने क्षेत्ररक्षणात कमालीचा जोश दाखवला. 19 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फर्ग्युसनने अब्दुल समदचा षटकार जाणारा चेंडू रोखला. यावेळी शुभमन गिलने त्याच्यासोबत योग्य ताळमेळ साधत अब्दुल समदच्या खेळीला ब्रेक लावला.  

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 19 व्या षटकात शिवम मावी गोलंदाजी करत होता. त्याच्या अखेरच्या चेंडूवर अब्दुलने उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट स्विंग मुव्हमेंट थोडी कमी पडल्यामुळे  चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला नाही. यावेळी फर्ग्युसनने कमालीच्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत चेंडू रोखला. चेंडू अडवत असताना तोल सीमेपलीकडे जातोय असे लक्षात आल्यानंतर त्याने चेंडू मैदानात फेकला. शुभमन गिलने त्याला अप्रतिमरित्य कव्हर दिला. सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊन कोलकाताला विजय मिळाला. त्यामुळे या धावांचे मोल निश्चितच अधिक होते. 

कोलकाताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 163 धावा केल्या. सामना टाय झाल्यानंतर निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. यावेळी केकेआरचा कर्णधार  इयॉन मॉर्गनने लॉकीवर विश्वास दाखवला. लॉकीनं कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अवघ्या तीन चेंडूत 2 धावा खर्च करुन दोन विकेटस् घेतल्या. कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये केवळ 3 धावांचे लक्ष्य मिळाले. इयॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिकने मैदानात उतरत चार चेंडूत हे लक्ष्य पार करुन कोलकाताच्या खात्यात दोन गुण जमा केले. 


​ ​

संबंधित बातम्या