IPL 2021 : पांड्येजीनं घेतला जबऱ्या कॅच; VIP गॅलरीतून मिळाली दाद (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Sunday, 11 April 2021

राशीद आणि नबीने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. उत्तुंग फटकेबाजी क्षमता असलेल्या अष्टपैलू आंद्रे रसेलची विकेटही राशीदने घेतली.

चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणा याने फोल ठरवला. प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार, टी-नटराजन याचा त्याने चांगलाच समाचार घेतला. एक विकेट गमावल्यानंतर नितीश राणाला राहुल त्रिपाठीची चांगली साथ लाभली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 धावा केल्या. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे  कोलकाता नाईट रायडर्संचा संघ 200 धावांचा टप्पा सहज गाठणार असे वाटत होते. मात्र राशीद खान आणि मोहम्मद नबीने मध्यफळीतील स्फोटक फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत कोलकाता नाईट रायडर्सला 188 धावांत रोखले. 

 

राशीद आणि नबीने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. उत्तुंग फटकेबाजी क्षमता असलेल्या अष्टपैलू आंद्रे रसेलची विकेटही राशीदने घेतली. रसेल अवघ्या 5 धावांची भर घालून चालता झाला. संघाच्या धावफलकावर चांगली धावसंख्या असल्यामुळे मॉर्गनने त्याला बढती देऊन फटकेबाजी करण्यासाठी पाठवले होते. पण राशीदने हा गेम प्लॅन हाणून पाडला. 17 व्या षटकातील राशीदच्या दुसऱ्या चेंडूवर रसेलने लॉग ऑनच्या दिशेने फटका मारला. मनिष पांड्ये याने चपळाई दाखवत एक उत्तम झेल टिपला. त्याच्या या झेलला व्हीआयपी प्रेक्षक गॅलरीतून संघाच्या CEO काव्या मारन यांनी टाळ्या वाजवून दाद दिल्याचे पाहायला मिळाले. 

IPL 2021 : कोरोनातून सावरलेल्या KKR च्या राणादाची स्फोटक खेळी

कोण आहेत काव्या मारन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)  14 व्या हंगामाच्या मिनी लिलावावेळी देखील काव्या मारन या फ्रेंचायझी टेबलवर दिसल्या होत्या. आयपीएलच्या लिलावावेळी अनेकदा या ब्यूटीफूल चेहऱ्यावर कॅमेरा फिरल्याचे पाहायला मिळाले. काव्या मारन या टीमचे मालक कलानिती यांच्या कन्या आहेत. त्या संघाच्या CEO देखील आहेत. हैदराबादच्या सामन्यावेळी त्या मैदानात उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातही त्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी VIP गॅलरीत हजर राहिल्याचे पाहायला मिळाले.


​ ​

संबंधित बातम्या