इंग्लंड-ऑस्ट्रलियनची मानसिकता कमजोर - सौरव गांगुली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 : भारतीय क्रिकेटपटू किती तरी पटीने अधिक सहनशील असतात

कोलकाता  : इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या तुलनेत मानसिक स्वास्थासाठी भारतीय क्रिकेटपटू किती तरी पटीने अधिक सहनशील असतात असे मत माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. कोरोना महामरीमुळे पर्याय नसलेल्या जैव सुरक्षा वातावरणात रहाणे हे फारच आव्हानात्मक असल्याचेही ते म्हणाले. कोरोन महामारीच्या संकटात क्रिकेट सुरू ठेवायचे असेल तर जैव सुरक्षा वातावरण तयार करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे हॉटेल आणि स्टेडिेयमवर एवढ्या पूरतेच खेळाडूंचे जीवन मर्यादित रहाते. जैव सुरक्षा वातावरणात नसल्या इतर कोणालाही भेटता येत नसते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने याबाबत जाहीर मतप्रदर्शन केले होते. अशा चौकटीच्या जीवनाचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो असेही विराट कोहली म्हणाला होता.

परदेशी खेळाडूंच्या तुलनेत भारतीय अधिक सहनशिल असतात, मी अनेक इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज खेळाडूंबरोबर खेळलो आहे. मानसिक स्वास्थाचा प्रश्न येतो तेव्हा ते शरणागती स्वीकारतात, असे गांगुली सांगितले. गेल्या सहा ते सात महिन्यात सर्वच क्रिकेट जैव सुरक्षा व्यवस्थेच्या चौकटीत बांधले गेले आहे.  हॉटेल रूमधून थेट मैदानात जायचे आणि तेथे आव्हानांचा सामना करायचा आणि तेथून थेट पुन्हा हॉटेलच्या रूमवर परतायचे हे फारच कठीण आणि आव्हानात्मक असल्याचे गांगुली म्हणाले.

हेही वाचा : क्रिकेट खेळत नसता तर, इसिसमध्ये असता; तस्लीमा नसरीनचं सीएसकेच्या खेळाडूविरोधात ट्वीट

परदेशी खेळाडूंच्या कमजोर मानसिकतेचे उदाहरण देताना गांगुली यांनी ऑस्ट्रेलियाचे उदाहरण दिले. भारताकडून मायदेशात हार स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौराच रद्द केला आणि त्यासाठी कोरोना महामारीचे कारण दिले.  कोरोनाची भीती रहाणार आहे. पुढच्या वेळेस ती माझ्यासाठी नसेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी तुम्हाला सकारात्मक रहायला हवे, स्वतःच्या मनाची ताकदही वाढवायला हवी, लहानपणपासून आपण असेच तयार झालो आहोत त्यामुळे भारतीय सक्षम असतात, असेही गांगुली म्हणाले.

हेही वाचा : सुपरफ्लॉप झाल्यानंतरही मॅक्सवेलवर का होतेय पैशांची उधळण?

२००५ मध्ये आपल्यला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले त्याचबरोबर संघातून वगळण्यात आले माझ्यासाठी तो मोठा धक्का होता, परंतु जोरदार पुनरागमन करुन मी त्यावर मात केली होती. असे प्रसंग येत असतात त्याला तुम्ही कोणत्या मानसिकतेने सामोरे जाता हे महत्वाचे असते. खेळ असो वा उद्योग क्षेत्र कशातही शास्वती नसते, चढ-उतार येत असतात. तुम्हाला धैर्याने सामोरे जायचे असते, असे सांगून गांगुली म्हणतात, प्रत्येकाच्या जीवनात दडपण असतेच. प्रत्येकाला याचा सामना करावा लागतोच; पण जो लढतो तो टिकतो.


​ ​

संबंधित बातम्या