'वरिष्ठ भारतीय खेळाडूंना निर्बंध आवडत नव्हते'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 May 2021

काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना आयपीएलच्या वेळी असलेले जैवसुरक्षा निर्बंध आवडत नव्हते, अशी टिप्पणी मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक मार्गदर्शक जेम्स पामेंत यांनी केली.

वेलिंग्टन - काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना आयपीएलच्या वेळी असलेले जैवसुरक्षा निर्बंध आवडत नव्हते, अशी टिप्पणी मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षक मार्गदर्शक जेम्स पामेंत यांनी केली.

भारतीय खेळाडूंना काय आवडत नव्हते, तसेच कोणी नाराजी व्यक्त केली होती, याबाबत पामेंत यांनी काहीही सांगितले नाही. ते म्हणाले, भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंधात राहणे पसंत नव्हते. काय करायचे, असे ते विचारत; मात्र आम्हाला  त्या वातावरणात सुरक्षित वाटत होते. या वातावरणातून बाहेर पडावे, असे कधीही वाटत नव्हते, असे त्यांनी सांगितले. 

आयपीएलचे पूर्णपणे मुंबईतच संयोजन शक्य होते; आमच्या संघात सुरुवातीसच एकास बाधा झाली. त्यानंतर आम्ही सतर्क झालो.
- जेम्स पामेंत, मुंबईचे क्षेत्ररक्षक मार्गदर्शक


​ ​

संबंधित बातम्या