IPL 2020: एबीच्या षटकारानं RCB चा विजय; RR 'स्मित' हास्याला मुकलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 30 November 2020

दुबईच्या मैदानात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदादाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs RCB 33rd Match : एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दुबईचं मैदान मारलं. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात जोफ्राच्या चेंडूवर षटकार खेचत एबीनं संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला दुसऱ्या बाजूला गुरकिरत सिंगनं 17 चेंडूत 19 धावा करुन साथ दिली. फिंच (14), देवदत्त पदिक्कल (35) आणि कर्णधार  विराट कोहली 43 धावा करुन बाद झाल्यानंतर एबीनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 1 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने 22 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली.

सलामीवीरांनी पहिल्यांदाच स्पर्धेत केलेली अर्धशतकी भागीदारी त्यानंतर कर्णधार स्मिथनं लगावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  दुबईच्या मैदानात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदादाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात त्याने बेन स्टोक्ससोब बटलर ऐवजी रॉबिन उथप्पाला बढती दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. क्रिस मॉरिसने ही जोडी फोडली.

त्याने बेन स्टोक्सला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतकाजवळ असलेल्या रॉबिन उथप्पा चहलच्या फिरकीत अडकला. त्याने 41 धावांची खेळी केली. सॅमसनलाही चहलने स्वस्तात माघारी धाडले. संजू सॅमसनला केवळ 9 धावा करता आल्या. बटलर 24 धावा करुन माघारी फिरला. क्रिस मॉरिसनं त्याची विकेट घेतली. स्मिथनं अर्धशतकासह आयपीएलमध्ये 1000 धावांचा टप्पाही पार केला. स्मिथनं 36 चेंडूत 57 धावांची खेळी केली. क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर शाबाजनं त्याचा उत्तम झेल टिपला. राहुल तेवतियाने 11 चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर मॉरिसनं जोफ्राला पायचित केले.  

सामन्याचे अपडेट्स :

102-3​ : कोहलीच्या रुपात बंगळुरुचा मोठा धक्का, कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर राहुल तेवतियाने टिपला अप्रतिम झेल

 102-2 : देवदत्त पदिक्कल माघारी, राहुल तेवतियानं संघाला मिळवून दिलं दुसरं यश

23-1 : एरॉन फिंचच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का, श्रेयस गोपाळनं मिळवून दिलं यश

-----------------------------------------------------------------------------------------------

177-6 : जोेफ्रा पायचित, मॉरिसची चौथी शिकार

173-5  : स्मिथ 57 धावांवर बाद, शाबाजनं सीमारेषेवर घेतला सुरेख झेल

127-4  : क्रिस मॉरिसला दुसरे यश, बटलरला 24 धावांवर धाडले माघारी

69-3 : चहलला आणखी एक यश, संजू सॅमसनला 9 धावांवर धाडले माघारी

69-2 : चहलन राजस्थानच्या संघाला दिला मोठा धक्का, रॉबिन उथप्पानं 22 चेंडूत 41 धावा केल्या

50-1  : क्रिस मॉरिसनं सलामीची जोडी फोडली, बेन स्टोक्स 19 चेंडूत 15 धावा करुन माघारी

Royal Challengers Bangalore (Playing XI): एरॉन फिंच, देवदत्त पदिक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरुकिरतसिंगस वांशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, शहाबाझ अहमद, इसुरु उडाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल.

Rajasthan Royals (Playing XI): बेन स्टोक्स, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी

नाणेफेक जिंकून स्मिथनं स्विकारली फलंदाजी


​ ​

संबंधित बातम्या