RRvsRCB : नवव्या सामन्यात स्मिथचा नवा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी!

सुशांत जाधव
Saturday, 17 October 2020

क्रिस मॉरिसनं 15 धावांवर बेन स्टोक्सला तंबूचा रस्ता दाखवला. ज्यावेळी राजस्थानची पहिली विकेट पडली त्यावेळी संघाच्या धावफलकावर 50 धावा लागल्या होत्या.

Rajasthan vs Bangalore, 33rd Match : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं स्पर्धेतील नवव्या सामन्यात सलामीचा नवा प्रयोग केला. आउट ऑफ फॉम असलेल्या रॉबिन उथप्पाला त्याने बढती दिली. बेन स्टोक्ससोबत उथप्पाने राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. आतापर्यंत सामन्यांच्या तुलनेत या जोडीनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली.  

RR vs RCB 33rd Match Updates : एका क्लिकवर  

क्रिस मॉरिसनं 15 धावांवर बेन स्टोक्सला तंबूचा रस्ता दाखवला. ज्यावेळी राजस्थानची पहिली विकेट पडली त्यावेळी संघाच्या धावफलकावर 50 धावा लागल्या होत्या. स्पर्धेतील राजस्थानकडून सलामी जोडीची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. यापूर्वीच्या आठ सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीला 3 षटकाच्या वर एक चेंडूही खेळता आला नव्हता. एवढेच नाही तर  चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या सलामी जोडीला 3 षटकेही मैदानात थांबता आले नव्हते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात जोस बटलर आणि बेन स्टोक्स जोडीनं 37 धावांची भागीदारी केली होती. तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बटलर बाद झाला होता. 

IPL 2020 : नेतृत्व बदलाचा कोलकाता नाईट रायडर्सला बसू शकतो फटका!

बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विरुद्धच्या सामन्यात 5.4 षटकात 50 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इतर सामन्याच्या तुलनेत स्मितचा हा प्रयोग थोडाफार यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. रॉबिन उथप्पाने मिळालेल्या बढतीनंतर 22 चेंडूत 41 धावा करत सलामीला पाठवल्याचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या