RCBvsRR : मॅच रोमहर्षक स्थितीत असताना फिंच करत होता स्मोकिंग, व्हिडिओ व्हायरल

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना याची मुभा दिली आहे की केवळ फिंचला? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थितीत करण्यात येत असून फिंचमुळे बीसीसीआयलाही ट्रोल करण्यात येत आहे. 

Rajasthan vs Bangalore, 33rd Match दुबईच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं दिलेले 178 धावांचे चॅलेंज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं परतावून लावलं. एबीनं 19 व्या षटकात लगावलेल्या सलग तीन सिक्सरमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. जोफ्राच्या अखेरच्या षटकात एबीनं षटकार खेचत विजय पक्का केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 2 चेंजू आणि 7 विकेट राखून सामना जिंकला. 

IPL 2020: एबीच्या षटकारानं RCB चा विजय; RR 'स्मित' हास्याला मुकलं

शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक परिस्थितीत सुरु असलेल्या सामन्याच्या शेवटच्या षटकातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामीर असणारा एरॉन फिंच स्मोकिंग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना याची मुभा दिली आहे की केवळ फिंचला? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थितीत करण्यात येत असून फिंचमुळे बीसीसीआयलाही ट्रोल करण्यात येत आहे. 

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 बाद 177 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी फिंच आणि देवदत्त पदिक्कल यांनी बंगळुरुच्या डावाला सुरुवात केली. फिंच अवघ्या 14 धावा काढून तंबूत परतला होता. 
 


​ ​

संबंधित बातम्या