IPL2021 : केदारची कॉपी अश्विनला पडली महागात; व्हिडिओ तुफान व्हायरल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

IPL2021 :चेन्नईच्या फलंदाजांनी अश्विनची मनसोक्त पिटाई केली. 

IPL2021 : आयपीएल १४ च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांमननी दिल्लीच्या आर. अश्विनची चांगलीच धुलाई केली. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण टाकण्यासाठी आर. अश्विन यानं विविध प्रकारच्या स्टाइलनं गोलंदाजी फेकली. एकवेळ तर अश्विन यानं केदार जाधव याच्या गोलंदाजीची नकल केली. पण चेन्नईच्या फलंदाजांना अश्विन रोखू शकला नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी अश्विनची मनसोक्त पिटाई केली. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दिल्लीमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दिल्लीचा गोलंदाज अश्विन हैदराबादच्या केदार जाधवची नकल करताना दिसला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अश्विन यानं हुबेहूब केदार जाधवची नकल केल्याचं पाहायलं मिळालं. 
आपल्या वयक्तिक तिसऱ्या षटाकात गोलंदाजीसाठी आलेल्या अश्विन यानं चेन्नईच्या फंलदाजाला चकवण्यासाठी केदारच्या स्टाइलनं गोलंदाजी केली. पण मोईन अलीला याचा काही एक फरक पडला नाही. मोईन अलीनं अश्विनच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची बरसात केली. 

पाहा व्हायरल व्हिडिओ -

अश्विन यानं चेन्नईविरोधात आपल्या चार षटकात ४७ धावा दिल्या पण एकही बळी मिळवता आला नाही. चेन्नईनं २० षटकांत १८८धावा उभारल्या होत्या. दिल्लीनं हा सामना सात गड्यांनी जिंकला. आज, हैदराबाद आणि कोलकाता यांच्यादरम्यान लढत होणार आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या