IPL 2021 : कुंबळे म्हणाले; शाहरुखमध्ये दिसते पोलार्डची झलक!

टीम सकाळ स्पोर्ट्स
Monday, 5 April 2021

ज्यावेळी मी मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य होतो त्यावेळी मी नेट्समध्ये पोलार्डला गोलंदाजी केलीय.

पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी   युवा फलंदाज शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. शाहरुखमध्ये केरॉन पोलार्डची झलक दिसते, असे वक्तव्य अनिल कुंबळे यांनी केलंय.  कुंबळेंनी मुंबई इंडियंन्सच्या (Mumbai Indians) नेट्स प्रॅक्टिसमध्ये पोलार्डला गोलंदाजी केली आहे. शाहरुखमध्ये कॅरेबियन ऑल राउंडरसारखी क्षमता आहे, असे त्यांचे म्हणने आहे.

ज्यावेळी मी मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य होतो त्यावेळी मी नेट्समध्ये पोलार्डला गोलंदाजी केलीय. नेट्समध्ये तो जबरदस्त बॅटिंग करायचा. अगदी पोलार्डप्रमाणेच शाहरुखही एक उत्तम ऑल राउंडर असल्याचे वाटते. शाहरुखमध्ये डावाला कलाटणी देण्याची क्षमता आहे, असे कुंबळेंनी म्हटले आहे. नेट्समध्ये पोलार्डला गोलंदाजी करतानाचा किस्साही त्यांनी शेअर केलाय. ज्यावेळी मी नेट्समध्ये पोलार्डला गोलंदाजी करायचो त्यावेळी माझ्याकडे चेंडू मारु नकोस, तो मी पकडण्याचा प्रयत्नही करणार नाही, असे म्हणायचो. सध्या माझे वय आणखी वाढले आहे त्यामुळे शाहरुखला नेटमध्ये गोलंदाजी करणार नाही, हे पक्के आहे, असे कुंबळे म्हणाले.  

क्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं

कुंबळेंनी कौतुक करणं मोठी गोष्ट - शाहरुख खान

कुंबळे यांनी केलेल्या कौतुकाने शाहरुख खान भारावून गेलाय.  दिग्गजाकडून कौतुक होणे मोठी गोष्ट आहे, यामुळे निश्चितच प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिलीये. पंजाब टीममधील सदस्य आणि स्टाफ मेंबर्सकडून खूप गोष्टी शिकायला मिळतात, असे शाहरुखने म्हटले आहे.  

शाहरुखसाठी पंजाबने मोजलीये 5.25 कोटी इतकी मोठी रक्कम 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून खेळताना शाहरुखने लक्षवेधी खेळी केली होती. आयपीएलच्या लिलावात याचा त्याला चांगला मोबदला मिळाला. पंजाबच्या संघाने 20 लाख मूळ किंमत असलेल्या शाहरुखसाठी  5.25 कोटी मोजले. आतापर्यंतच्या 131 टी-20 सामन्यात त्याने 293 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. फलंदाजीशिवाय ऑफ स्पिनने फलंदाला नाचवण्याची क्षमताही त्याच्यात असून तो यंदा पंजाबला किती फायदेशीर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​ ​

संबंधित बातम्या