IPL 2020 : राहुलचं आणखी एक अर्धशतक; अब तक 500+

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

एका बाजूला लोकेश राहुल कर्णधाराला साजेसा खेळ करत असताना दुसऱ्या बाजूला संघातील अन्य सहकाऱ्यांकडून त्याला साथ मिळताना दिसत नाही.

Mumbai vs Punjab, 36th Match : मुंबई इंडियन्सनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुलनं आणखी एक अर्धशतक झळकावले. 9 सामन्यातील 9 डावात त्याच्या नावे 5 अर्धशतकासह एका शतकाची नोंद आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 500 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात तो 18 व्या षटकापर्यंत तो मैदानात उभा राहिला. त्याने 51 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार खेचले.  

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सुरुवातीपासून तो अव्वलस्थानी आहे. त्याच्याच संघातील सहकाही मयांक अग्रवाल त्याच्या पाठोपाठ 393 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांच्यातील अंतर हे शंभरहून अधिक आहे. 

IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

एका बाजूला लोकेश राहुल कर्णधाराला साजेसा खेळ करत असताना दुसऱ्या बाजूला संघातील अन्य सहकाऱ्यांकडून त्याला साथ मिळताना दिसत नाही. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही पुन्हा तेच चित्र पाहायला मिळाले. लोकेश राहुल एकाकी खिंड लढवत असताना त्याचे शिलेदार मोजक्या धावा करुन तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. त्याच्यासोबत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या मयांक अग्रवालने या सामन्यात दोन अंकी संख्या कशी बशी गाठली. तो 10 चेंडूत 11 धावा करुन माघारी फिरला. 

सीमारेषेवर फर्ग्युसन-गिलमध्ये दिसला कमालीचा ताळमेळ

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला धाकड आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं 21 चेंडूत 24 धावा करुन बाद झाला. निकोलस पूरनने देखील 12 चेंडू खेळून तेवढ्याच धावा केल्या. महागड्या मॅक्सवेलला राहुल चाहरने खातेही उघडू दिले नाही. आघाडीचे आणि नावाजलेले खेळाडू साथ देत असताना गेल्या काही सामन्यात लोकेश राहुल सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यांपर्यंत लढताना दिसतोय. इतर सहकाऱ्यांची साथ लाभत नसल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या