IPL 2021 : रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 21 April 2021

आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती आहे.

चेन्नई येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव करत दिल्लीनं हिशेब चुकता केला. पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा दिल्लीनं सहा गड्यांनी पराभव केला. दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला त्यातच भर म्हणून रोहित शर्माला दंडही आकारण्यात आलाय. स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलनं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे.  

षटकांची गती राखता न आल्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार रोहित शर्मा दोषी आढळला. त्यामुळे दंड म्हणून त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान आणखी एकदा स्लो ओव्हरमध्ये दोषी आढळल्यास 24 लाखांचा दंड तसेच संघातील इतर खेळाडूंना सामन्याच्या 25 टक्के दंडाची शिक्षा होऊ शकते. याआधी चेईन्नईचा कर्णधार एम. एस. धोनी यालाही स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. 

आयपीएल 2021 मध्ये मुंबईच्या संघाची समिश्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चार सामन्यात मुंबईला दोन विजय आणि दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. गुणतालिकेत मुंबईचा संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.  


​ ​

संबंधित बातम्या