IPL 2020 : अंपायरच्या लुक्सवरून सोशल मीडियावर मिम्स व्हायरल

टीम ई-सकाळ
Sunday, 18 October 2020

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येत आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सत्रात आज डबल हेडर मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. याअगोदरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुंबई इंडियन्सने पराभूत केले होते. तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाला चेन्नई सुपर किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे प्लेऑफ मध्ये जागा मिळवण्यासाठी या दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे. मात्र हा सामना चालू झाल्यानंतर खेळाडूंपेक्षा जास्त एकाच दृश्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू झाली आहे. 

कोलकातासाठी आनंदाची बातमी ; सुनील नरेनला मिळाला 'ग्रीन सिग्नल'

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात अंपायरिंग पश्चिम पाठक करत आहेत. आणि अंपायरिंग करत असताना त्यांची शैली चाहत्यांना आकर्षित करत आहे. अंपायर पश्चिम पाठक यांचे केस मोठे असल्यामुळे त्यांचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर पश्चिम पाठक यांच्यावरील मिम्स देखील ट्विटरवर व्हायरल होण्यास सुरवात झाली आहे. 

पश्चिम पाठक यांनी भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम केले आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये पश्चिम पाठक यांनी हेल्मेट घालून अंपायरिंग केली होती. त्यामुळे देखील ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता आयपीएलमध्ये पश्चिम पाठक आपल्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत आहेत.   

दरम्यान, आयपीएल मध्ये आज दोन सामने होत असून, पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या