IPL MI vs KXIP : दोन सुपर ओव्हरनंतर पंजाबनं मुंबईला हारवून दाखवलं

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 18 October 2020

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हरनंतर लागला निकाल

आयपीएलच्या हंगामातील डबल हेडरच्या दुसऱ्या सत्रातील सामन्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सामन्याचा निकालासाठी दोन सुपर ओव्हर्स टाकण्यात आल्या. यात किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला पराभूत करत दोन गुण आपल्या खात्यात जमा केले. मुंबई इंडियन्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबकडन मंयाक आणि लोकेश राहुलने डावाला सुरुवात केली.  

सलामीवीर लोकेश राहुलचे दमदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकात दीपक हुड्डा आणि जार्डन यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन दाखवणार असे चित्र दिसत असताना 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लोकेश राहुल बाद झाला. या विकेटनंतर सामना जिंकून देण्याची जबाबदारी ही दीपक हुड्डा आणि जार्डन यांच्या खांद्यावर आली.  दिपक हुड्डानं 16 चेंडूत महत्त्वपूर्ण 23 धावा केल्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना दुसऱी धाव घेताना जार्डन धावबाद झाला. आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. 

नियमानुसार शेवटी बॅटिंग करणाऱ्या संघाने सुपर ओव्हर खेळण्यास सुरुवात केली. मुंबईने चेंडू जसप्रित बुमराहच्या हाती दिला. तर लोकेश राहुल पूरन यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं दोन गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा केल्या.  सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवण्यासाठी क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा जोडी मैदानात उतरली. शमीने त्यांना रोखून दाखवलं. एका चेंडूव दोन धावा हव्या असताना क्विंटन डिकॉक दुसरी धाव घेताना बाद झाला आणि सामना पुन्हा टाय झाला. सुुपर ओव्हरमध्ये सामना टाय झाल्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळण्यात आली. यावेळी बॅटिंग करण्याचा नंबर हा मुंबई इंडियन्सवर आला.  पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानात आले. हार्दिक पांड्या धावबाद झाला. पोलार्डने शेवटपर्यंत मैदानात उभे राहत 11 धावा केल्या.  

IPL 2020 SRHvs KKR : निकाल सुपर ओव्हमध्ये!

दुसऱ्या सुपर ओव्हमध्ये मिळालेले टार्गेट परतवण्यासाठी गेल आणि मयांक जोडी मैदानात उतरली. गेलने बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत पंजाबवरील दबाव कमी केला. त्यानंतर सिंगल घेत त्याने मयांककडे स्ट्राइक दिले. मयांकने दोन चौकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. 

सलामीवीर क्विंटन डिकॉकची सातत्यपूर्ण अर्धशतकी खेळी (53) आणि कृणाल पांड्या (34), केरॉन पोलार्ड (34)* आणि नॅथन कुल्टेर नील (24)* यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अर्शदीपने रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. रोहित अवघ्या 9 धावा करुन माघारी फिरला.

सूर्यकुमार यादवला शमीनं खातेही उघडू दिले नाही. अर्शदीपने इशान किशनलाही 7 धावांवर बाद केले. कृणाल पांड्या  रवि बिश्नोईच्या फिरकीत अडकला तर हार्दिक पांड्याला शमीनं चालते केलं.  दुसऱ्या बाजूला क्विंटन डिकॉकन डाव सावरण्याचा प्रयत्न केला.  क्रिस जार्डनने त्याला 53 धावांवर बाद केले. अखेरच्या षटकात पोलार्ड आणि कुल्टर नील यांनी  21 चेंडूच 57 धावांची भागीदारी करत संघाच्या धावफलकावर निर्धारित 20 षटकात 6 बाद 176 धावसंख्या लावली. दोघेही नाबाद परतले.  


​ ​

संबंधित बातम्या