IPL च्या मैदानातील जलद अर्धशतक! (Video)

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 16 September 2020

4  उत्तुंग चौकार आणि 6 खणखणीत चौकाराच्या मदतीने त्याने 51 धावांची खेळी साकारली होती.  अवघ्या 14 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले होते.

पुणे: क्रिकेटच्या मैदानातील सर्वाधिक लोकप्रिय आयपीएल स्पर्धा दुबईच्या मैदानात रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारणाय याप्रमाणे आयपीएलच्या रेकॉर्ड बूकमध्ये कोणते विक्रम नोंदवले जाणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. आयपीएलपूर्वी जाणून घेऊयात स्पर्धेतील काही खास आणि जवळपास दोन वर्ष अबाधित राहिलेल्या जलद अर्धशतकाच्या विक्रमाबद्दल...

IPL स्पर्धेत पहिला चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाचा हा विक्रम अद्यापही अबाधित!

किंग्ज इलेव्हन पंजाबचा विद्यमान कर्णधार केएल राहुलच्या नावे सर्वाधिक जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे. 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलने धमाकेदार खेळी केली होती. 4  उत्तुंग चौकार आणि 6 खणखणीत चौकाराच्या मदतीने त्याने 51 धावांची खेळी साकारली होती. त्याने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. या कामगिरीसह त्याने युसूफ पठाणच्या नावे असलेला 15 चेंडूतील अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला होता. 

ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी

2014 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या युसूफ पठाणने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 15 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. या यादीत कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा सुनील नरेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने बंगळुरु रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 15 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली होती. यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेल्या चेन्नूई सुपर किंग्जचा सुपरस्टारही पहिल्या पाचमध्ये आहे. 2014 मध्ये त्याने 16 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. सर्वाधिक जलद शतकी खेळी करणाऱ्या गेल या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 17 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.  


​ ​

संबंधित बातम्या