RRvsRCB:  शाब्बास! शहाबाजचा हा झेल एकदा पाहाच (VIDEO)  

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

पश्चिम बंगालच्या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूने  13 फर्स्ट क्लास  मॅचमध्ये  32.88 च्या सरासरीनं  559 धावा केल्या आहेत. ए लिस्टच्या 16 सामन्यात त्याच्या खात्यात 272 धावा जमा आहेत.

Rajasthan vs Bangalore, 33rd Match : विराट कोहलीनं ज्या युवा क्रिकेटरचे कौतुक केले होते. त्या शाहबाज अहमदने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने दोन षटकात 18 धावा दिल्या, पण त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले. हे अपयश त्याने आपल्या क्षेत्ररक्षणात भरुन काढले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथचा त्याने सीमारेषेवर अप्रतिम झेल टिपला. स्मिथने 36 चेंडूत 57 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार आणि 1षटकार खेचला.

RR vs RCB 33rd Match Update : एका क्लिकवर

मॉरिसच्या गोलंदाजीवर अहमदने सीमारेषेवर भन्नाट झेल पकडत स्मिथला थांबवले. राजस्थानच्या डावातील अखेरच्या षटकात क्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर स्मिथनं ऑफ साइडच्या दिशेने मोठा फटका खेळला. डिप कव्हरला फिल्डिंग करत असलेल्या अहमदने उत्कृष्ट  क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला.    

पश्चिम बंगालच्या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूने  13 फर्स्ट क्लास  मॅचमध्ये  32.88 च्या सरासरीनं  559 धावा केल्या आहेत. ए लिस्टच्या 16 सामन्यात त्याच्या खात्यात 272 धावा जमा आहेत. देशांतर्गत  टी20 सामन्यात त्याने 128.45 स्ट्राइक रेटनं 158 धावा केल्या आहेत. डावखुऱ्या हाताने फिरकी  गोलंदाजी करणाऱ्या अहमदच्या नावे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 37, लिस्ट ए मध्ये10 आणि टी20 मध्ये 15 विकेट आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या