IPL 2021: कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यावर भज्जीनं केला भांगडा (VIDEO)

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर कोलकाताच्या संघातील खेळाडू सरावासाठी सज्ज झाले आहेत.

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला होता. चेन्नईने रिलीज केल्यानंतर 2019 च्या आयपीएलच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. केकेआरने भज्जीसाठी 2 कोटी मोजले आहेत. 

सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर कोलकाताच्या संघातील खेळाडू सरावासाठी सज्ज झाले आहेत. सरावापूर्वी केकेआरने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात हरभजन सिंग एका रुममधून बाहेर पडताना दिसते. यावेळी तो कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हणताने ऐकायला मिळते. पंजाबी गाण्यावर भांगडा करत तो प्रॅक्टिसला जाण्यासाठी उतावळा झाल्याचे पाहायला मिळते.

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का; अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह

यापूर्वी  केकेआरचा मध्यफळीतील फलंदाज नीतीश राणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 22 मार्चपासून तो क्वारंटाईन होता. त्याची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने केकेआरला थोडासा दिलासा मिळाला आहे. केकेआरने त्याचाही एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो कोरोनाकडे दुर्लक्ष करु नका, योग्य ती खबरदारी घ्या! असा संदेश देताना पाहायला मिळाले होते.   

काही दिवसांपूर्वी 40 वर्षानंतरही आयपीएलमध्ये खेळत असल्याच्या मुद्यावरुन भज्जीला टार्गेट केलं होते. याला हरभजन सिंगने आपल्या शब्दांत उत्तर दिले होते. जोपर्यंत माझ्यात क्रिकेट खेळण्याची ताकद आहे तोपर्यंत मैदानात क्रिकेटचा आनंद घेत राहिन, असे भज्जी म्हणाला होता.  


​ ​

संबंधित बातम्या