फुटबॉलच्या लीगच्या धर्तीवर आयपीएलही होईल - मॉर्गन

पीटीआय
Wednesday, 28 April 2021

परदेशी खेळाडू आयपीएल मध्येच सोडून माघारी जाण्याचा विचार करत असले तरी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार आणि कोलकता नाईटरायडर्स संघाचे नेतृत्व करत असलेल्या ऑईन मॉर्गनचे मात्र वेगळेच मत आहे.

अहमदाबाद - परदेशी खेळाडू आयपीएल मध्येच सोडून माघारी जाण्याचा विचार करत असले तरी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार आणि कोलकता नाईटरायडर्स संघाचे नेतृत्व करत असलेल्या ऑईन मॉर्गनचे मात्र वेगळेच मत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लंडनमध्ये प्रीमियर लीग आणि जर्मनीत बुंडेस्लिगा या फुटबॉल लीगने टेम्पेट तयार केल्या होत्या त्याच धर्तीवर आयपीएलही होईल, असे मत मॉर्गनने व्यक्त केले.

सहा महिन्यांत ही दुसरी आयपीएल होत आहे. सहा महिन्यांपूर्वी अमिरातीत आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला होता. यंदाचा १४ वा हंगाम भारतात सुरू झाला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. त्यामुळे भारताच्या अश्विनसह ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंनी काढता पाय घेतला.

गतवर्षी लंडनमध्येही मोठा लॉकडाऊन होता. बराच काळ क्रिकेटही बंद पडले होते. त्यानंतर टीव्हीवर खेळाचा पहिला लाइव्ह सामना पाहिला तो न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात झालेला रग्बी युनियनचा सामना. त्यानंतर हळूहळू जर्मनीत बुंडेस्लिगा सुरू झाली त्यानंतर लंडनमध्येच प्रीमियर लीगही सुरू झाली होती. या दोन लीगने स्पर्धा कशी घ्यायची याचा नमुना सादर केला, परंतु जोपर्यंत तुम्ही इतर घटकांना नाराज करत नाही तोपर्यंत ठिक असते, असे मॉर्गन पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजयानंतर संवाद साधताना म्हणाला.

जगात तुम्ही कोठेही असा, आपल्या सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा योग्य वापर ही सुरक्षा बाळगणे अत्यावश्यकच आहे, असेही मॉर्गनने सांगितले.
आम्ही जैवसुरक्षा वातावरणात सुरक्षित आहोत, परंतु बाहेर काय चाललेय ते भयंकर आहे. या कठीण काळाशी सामना करत असलेल्या प्रत्येकाच्या सोबत आम्ही आहोत, असेही मॉर्गन म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या