IPL च्या 14 व्या हंगामातील 9 व्या टीमच्या कल्पनेवर द्रविड यांचा 'कव्हर ड्राइव्ह'

सुशांत जाधव
Friday, 13 November 2020

युएईतील आयपीएल हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर 2021 मध्ये रंगणाऱ्या 14 व्या हंगामात नववा संघ उतरल्याचे पाहायला मिळेल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. एवढेच नाही तर 2023 पर्यंत स्पर्धेतील फ्रेंचायजी संघाची संख्या 10 दिसेल, असेही बोलले जात आहे.

युएईतील आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सांगता होताच 14 व्या हंगामाची चर्चा सुरु झालीय. पुढील हंगामात 8 ऐवजी 9 संघ मैदानात उतरवण्यासाठी बीसीसीआय उत्सुक असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची प्रमुख राहुल द्रविड यांना ही आयडिया आवडली आहे. स्पर्धेतील सामन्यात कोणतीही तडजोड न करता नवी संघ खेळवण्याला काहीच हरक नाही, असे मत त्यांनी मांडले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये खूप टॅलेंट असून आयपीएल स्पर्धा विस्तारासाठी सज्ज असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. 

युएईतील आयपीएल हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर 2021 मध्ये रंगणाऱ्या 14 व्या हंगामात नववा संघ उतरल्याचे पाहायला मिळेल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. एवढेच नाही तर 2023 पर्यंत स्पर्धेतील फ्रेंचायजी संघाची संख्या 10 दिसेल, असेही बोलले जात आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या लॉन्ग टर्मच्या प्लॅनिंचा हा एक भाग असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगत आहे. या कल्पनेसंदर्भात राहुल द्रविड म्हणाले की, प्रतिभावंत खेळाडूंसाठी आयपीएलचा विस्तार करणं गरजेच आहे. त्यांना या व्यासपीठावर एक संधी उपलब्ध होईल. 

IPL 2020: कोहली-पॉटिंग यांच्यात रंगला होता स्लेजिंगचा खेळ; अश्विनने केला खुलासा
 
संघ वाढल्याने अधिक युवांसाठी संधी उपलब्ध होईल. याचा स्पर्धेवर काही परिणामही होणार नाही. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात द्रविड यांनी आयपीएलच्या नव्या कल्पनेसंदर्भात आपले मत व्यक्त केले. आयपीएलमुळे राहुल तेवतिया सारख्या खेळाडूंमधील क्षमता जगासमोर आली. यापूर्वी खेळाडूंची क्षमताही रणजीतील कामगिरीवर निश्चित केली जात होती. हरियणासारख्या राज्यात  युजवेंद्र चहल, अमित मिश्रा आणि जयंत यादव या गोलंदाजांच्या तुलनेत राहुल तेवतियाला अधिक संधी मिळाली नसती. आयपीएलमुळे सध्याच्या घडीला प्रतिभावंत खेळाडूंची पारख सोपी झाली आहे. ज्यांना रणजीमध्ये संधी मिळत नाही ते आयपीएलमधील लक्षवेधी कामगिरीनं आपल्यातील क्षमता सिद्ध करताना पाहायला मिळते. आयपीएलमध्ये त्यांना दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याचा फायदाही होईल, असे द्रविड यांनी म्हटले आहे.  


​ ​

संबंधित बातम्या