Points Table : मुंबईला धक्का देत चेन्नईची भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले...

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 April 2021

IPL points table 2021 : चेन्नईचा विजय अन् मुंबईची घसरण

IPL points table 2021 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सोमवारी फक्त राजस्थानवर मोठा विजय मिळवला नाही, तर गुणतालिकेत मोठी भरारीही घेतली. चेन्नईच्या संघाने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला आणि त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. ताज्या क्रमवारीनुसार, चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर मुंबईच्या संघ चौथ्या स्थानावर फेकला गेलाय. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने नेटरनरेटच्या आधारावर दुसरं स्थान पटकावलं आहे.  पहिल्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या किंग्जनं राजस्थानच्या रॉयल्सचा तब्बल 45 धावांनी पराभव केला. या पराभवासह राज्यस्थान संघची गुणतालिकेत घसरण झाली आहे. राजस्थानचा संघ सहाव्या स्थानी फेकला गेलाय. सातव्या क्रमांकावर पंजाब तर आठव्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे. हैदराबादच्या संघाला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. तिन्ही सामन्यात हैदराबादचा पराभव झालाय. (हेही वाचा : जड्डूने मैदानातून कुणाला लावला फोन?)

पाहा पाइंट टेबल -

मंगळवारी मुंबई आणि दिल्ली यांच्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सामना होणार आहे. यामधील विजेता संघ पहिल्या अव्वल दोनमध्ये कब्जा मिळवेल. त्यामुळे आता आजच्या  सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर पोहोचतो का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर?
दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) शिखर धवनने (Shikhar Dhawan) 3 सामन्यात 186 धावा ठोकल्या आहेत. शिखर धवनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या आरसबीच्या हर्षल पेटल यानं पर्पल कॅपवर आपलं नाव कोरलं आहे. हर्षल यानं तीन सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या